मे महिन्यातही बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस;काय आहे पंजाब डख यांचा अंदाज
क्लिक2आष्टी अपडेट-सध्या उन्हाळ्याचे दिवस असून,
राज्यातील शेतकरी बांधव येत्या खरीप हंगामासाठी पूर्व तयारी करत आहेत.शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांकडून जोरात सुरू आहेत.मात्र या मशागतीच्या कामांमध्ये व्यत्यय येतोय तो अवकाळी पावसामुळे. अवकाळी पावसामुळे पूर्व मशागतीचे कामे रखडली आहेत तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना देखील याचा मोठा फटका बसत आहे.एप्रिल महिना तर आता संपला पण मे महिन्यातही आवकाळीचा अंदाज असल्याचे हवानाम तज्ञ पंजाब डख यांनी सांगीतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या त्राहीमामामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक भुई सपाट झाली आहेत.दरम्यान आता आपल्या हवामान अंदाज यासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थातच पंजाब डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.डख यांनी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.बीड, सोलापूर,लातूर,परभणी,अकोला,अमरावती,बुलढाणा, नांदेड, वाशिम,हिंगोली,नागपूर,चंद्रपूर,यवतमाळ,छत्रपती संभाजीनगर, जालना,जळगाव या जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.विशेष बाब म्हणजे दोन दिवसानंतरही राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे.पावसाची तीव्रता मात्र कमी होणार आहे.जवळपास तीन ते चार मे पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.काही भागात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी देखील पाऊस पडणार आहे.या कालावधीमध्ये काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.पुन्हा विशेष म्हणजे १५ मे च्या सुमारास देखील राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.अर्थातच मे महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला असून हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.दरम्यान येत्या मान्सून बाबत देखील पंजाब डख यांनी माहिती दिली आहे.डख यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा आठ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. आठ जूनला मान्सूनचे आगमन होईल आणि २२ जून पर्यंत सर्व महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल असे त्यांनी सांगितले आहे.जून महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या होणार आहेत.
तसेच जून पेक्षा जुलैमध्ये जुलैपेक्षा ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अर्थातच २०२२ मध्ये जसा पाऊस झाला तसाच यंदाच्या मान्सून मध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाजही पंजाब डख यांनी वर्तविला आहे.