व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बापाने दोन महिन्याच्या चुमूकलीची हात्या करून;प्लॅस्टिकच्या डब्यात

0

क्लिक2आष्टी अपडेट-उपचार करूनही मुलगी बरी होत नसल्यामुळे एका वडिलांनी आपल्या अडीच महिन्यांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची संतापजनक घटना बिहारची राजधानी पाटण्यात घडली आहे.अंशी नामक या कोवळ्या मुलीच्या हृदयात छिद्र होते. 27 एप्रिल रोजी तिचा मृतदेह स्वयंपाक घरातील प्लॅस्टिकच्या डब्यात आढळला. वडिलांनी 26 एप्रिल रोजी तिची हत्या केली होती. त्यानंतर किचनमधील डालड्याच्या डब्यात त्यांनी तिचा मृतदेह लपवून ठेवला.
आईने मुलीची विचारणा सुरू केली असता त्यांनी तिला शोधण्याचे नाटक सुरू केले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी पोलिसांना मुलीचा मृतदेह स्वयंपाकघरातील डालड्याच्या डब्यात आढळला.घटनेच्या आठवडाभरापूर्वीही या नराधम बापाने मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता.पण सुदैवाने ती बचावली होती.पोलिसांच्या 8 तासांच्या चौकशीत वडिलांनी शुक्रवारी हा संपूर्ण प्रकार सांगितला.कदमकुआन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काजीपूर येथे ही घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.