बिल्किस बानो प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
क्लिक2आष्टी अपडेट-बिल्किस बानो प्रकरणी आज दि.२ मे रोजी दुपारी २ वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी १८ एप्रिल रोजी शेवटची सुनावणी झाली होती. यादरम्यान न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने सरकारला दोषींच्या सुटकेचे कारण विचारले होते.कोर्टाने म्हटलं होतं- आज हे बिल्किस बानो यांच्यासोबत घडले आहे, उद्या तुमच्या आणि आमच्या बाबतीतही घडू शकते.
११ दोषींच्या सुटकेला आव्हान बिल्किस यांनी याचिकेत गुजरात सरकारवर खटल्यातील दोषींना मुदतीपूर्वी सोडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ११ दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र आणि गुजरात सरकारला दोषींच्या मुदतपूर्व सुटकेशी संबंधित फाइल्स सादर करण्यास सांगितले.जर तुम्ही दोषींना सोडण्याचे कारण सांगितले नाही तर आम्ही आमचाच निष्कर्ष काढू, असे न्यायालयाने म्हटले होते.