व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“आपला दवाखाना”या उपक्रमाद्वारे गोरगरीब मजूर वर्गातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत-आमदार बाळासाहेब आजबे

0

क्लिक2आष्टी अपडेट-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” हा राज्य सरकारचा उपक्रम असून या आपला दवाखाना या योजनेद्वारे समाजातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला उपचारांची सुविधा मिळत आहे. ही सुविधा दैनंदिन आणि दर्जेदार पद्धतीने मिळावी असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले.
आष्टी शहरातील सायकड गल्ली परिसरामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” हा या उपक्रमाचे आज उद्घाटन समारंभामध्ये आमदार बाळासाहेब आजबे बोलत होते.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,तहसीलदार विनोद गुंडमवार,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, माजी सभापती बद्रीनाथ जगताप,आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,प्रभाकर आनंत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी,काकासाहेब शिंदे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,डॉ.नितीन मोरे,दीपक उंबरकर,अक्षय हळपावत,नागेश करांडे,दीपक पडोळे,पठाण मामु आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की, आरोग्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असून सर्वसामान्य जनतेला शासनाद्वारे मोफत उपचार मिळत आहेत ही स्वागतार्ह बाब असून या उपक्रमाचा गोरगरीब जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रास्ताविकामध्ये आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे म्हणाल्या की,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमांतर्गत अत्यंत सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या झोपडपट्टी विभागात रहिवास असणाऱ्या नागरिकांना या उपक्रमाद्वारे उपचार मिळणार आहेत. या आपला दवाखाना या उपक्रमाचे अनेक उद्दिष्ट असून त्यापैकी दवाखाने आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवणे सातत्यपूर्ण आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा देणे विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करणे ही उद्दिष्टे असून या ठिकाणी बाह्य रुग्ण सेवा, ओपीडी, मोफत औषधोपचार,मोफत तपासणी, महिन्यातून एका दिवशी नेत्र तपासणी,गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी आणि मदतनीस हे उपस्थित राहणार असून दररोज दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हा आपला दवाखाना सुरू राहणार असल्याने दिवसभर मोलमजुरी करून घरी परतल्यानंतर मोफत उपचारासाठी या आपला दवाखान्याची वेळ अशाप्रकारे नियोजन करण्यात आल्याची माहिती ही डॉ.जयश्री शिंदे यांनी यावेळी दिली.आभार प्रदर्शन आरोग्य कर्मचारी अनिल अष्टेकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.