अपघातामध्ये हात गमवला;पण”नागेबाबा”ने दिला आधार
क्लिक2आष्टी अपडेट-नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे ३६५ दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या,सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, सक्षम झाला पाहिजे यासाठी काम करते. याचाच एक भाग म्हणून संस्थेने नागेबाबा सुरक्षा कवच ही एक योजना चालू केली. या योजने अंतर्गत पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला दहा लाख रुपये व अपघाती हॉस्पीटल खर्चासाठी 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.आष्टी तालुक्यातील धामणगाव शाखेचे खातेदार श्री गहिनीनाथ गर्जे यांचा काही दिवसांपूर्वी अपघातामध्ये हात गेला होता.त्यामध्ये त्यांना ५०% अपंगत्व आले त्यामध्ये त्यांना नागेबाबा सुरक्षा कवच योजने अंतर्गत ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच डॉ श्रीराम गर्जे,ह.भ.प.बाळू महाराज गर्जे, आदर्श शिक्षक झिंजूरके राजकुमार सर, बोडखे सर, गर्जे सर, आदी खातेदार सभासद उपस्थित होते. कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ श्रीराम गर्जे साहेब होते. सूत्रसंचालन शाखाधिकारी सचिन बोडखे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे शेअर्स डिपार्टमेंट हे हेड योगिता पटारे मॅडम यांनी तर आभार आष्टी शाखेचे शाखाधिकारी संदिप टेकाडे यांनी मानले.