व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गौतमी पाटीलचा तो “व्हिडीओ”व्हायरल करणारा सापडला…!

0

क्लिक2आष्टी अपडेट-राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता,तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल केला प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे.
गौतमी पाटील हीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यावरून पुणे पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती.त्यानंतर गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. रोज नवीन वादात अडकणाऱ्या गौतमीची पाठ काही वाद सोडायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी एक घृणास्पद घटना घडली.तिचे कपडे बदलतानाची क्लिप एका विकृताने व्हायरल केल्याने तिला धक्काच बसला होता.गौतमी पाटील हीने यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.या मुलाखतीत तिने व्हायरल झालेल्या व्हि़डीओबाबत भाष्य केले आहे.ती म्हणाली,जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा एक क्षण मला काय करावे कळत नव्हते,पण मग मी आधी हा व्हिडिओ माझ्या आईला पाठवला. याचं कारण म्हणजे इतर कोणी तिला हा व्हिडीओ पाठवला असता तर ते बघून तिला सहन झालं नसतं म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मी स्वत:तिला हा व्हिडीओ पाठवला.याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास लावत आता ह्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.मुलगा अल्पवयीन असल्याने उद्या आई-वडील आणि मुलगा यांना पोलीस ठाण्यात होणार हजर होण्यास सांगितले आहे.या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.परंतु या प्रकरणी एक अल्पवयीन मुलगा सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.