शेतक-यांना जाणून-बुजून ञास देत असाल तर याद राखा आमदार सुरेश धसांनी जिल्हाकृषी अधिक्षकांना झाप-झाप झापले !
क्लिक2आष्टी अपडेड-शेतक-यांना दुजाभावाची वागणूक असल्याच्या तक्रारी या कार्यालयाच्या व तुमच्या आल्या असल्याने आज मी स्वत;आलो पण आम्हालाही अशी उडवा-उडवी चे उत्तरे मिळत असल्याने शेतक-यांची काय गत होत असेल तरहे योग्य नाही.आपला कारभार सूधारा अन् जिल्ह्यातील शेतक-यांचे वजवाटूळे जाणून-बुजून करून त्यांना ञास देत असाल तर याद राखा असा सज्जड दम देत जिल्हाकृषी अधिक्षक जेजूरकर यांना आमदार सुरेश धसांनी झाप-झाप-झापले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गुरूवार दि.४ रोजी आमदार सुरेश धस हे शेतक-यांनसमावेत दुपारी चार च्या दरम्यान जिल्हाकृषी कार्यालयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा कृषीअधिक्ष यांना विनवनी करण्यासाठी दाखल झाले.परंतु जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या दालनात आमदार धस व शेतक-यांनी प्रवेश करताच जिल्हा कृषी अधिक्षक जेजूरकर यांनी पोलिसांना बोलावून काहि शेतक-यांना दालनाच्या बाहेर जाण्यास सांगताच आमदार धस हे भडकले.त्यांनी आगोदर पोलिसांना सांगितले की,तुम्ही बाहेर थांबा आम्हाला बोलायचे आहे.आम्ही या साहेबांना काळं वंगण सुध्दा आणले नाही लावायला.यावर पोलिसांनी माघार घेत तिथेच उभे राहिले.आमदार धस यांनी जिल्हाकृषी अधिक्षक जेजूरकर यांना तुम्ही जर शेतक-यांचे वाटोळे करत असाल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे.एक आवकाळी पावसाने शेतकरी नेस्तानाबूत झाला आता तुमच्या चुकीचा माहितीने असे बोलून आ.धसांनी जिल्हाकृषी अधिक्षक यांना झाप-झाप झापले..!