कालव्यात अचानक नोटांची बंडले तरंगताना लोकांना आढळली;पैसे घेण्यासाठी नागरीकांची झुंबड
क्लिक2आष्टी अपडेट-कालव्यात अचानक नोटांची बंडले तरंगताना लोकांना आढळली.कालव्यात नोटा सापडत असल्याने एकच खळबळ उडाली होती.हा पैसा लुटण्यासाठी लोकांनी कालव्यात उड्या मारल्या.काहींनी एका हाताने तर काहींनी दोन्ही हातांनी नोटांची बंडले उचलण्यास सुरुवात केली.हाताला जेवढे लागतील तेवढे घेऊन लोक कालव्याबाहेर पडताना दिसले.हि घटना बिहारमधील सासारामच्या मुरादाबाद येथे घडली आहे.
कालव्यातून नोटांचे बंडल लुटल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की लोक कॅनॉलमध्ये 10-10 रुपयांच्या नोटांचे बंडल जमा करत आहेत.कुणी कालव्यातून बाहेर काढत आहे,तर कुणाचा नातेवाइक टॉवेल घेऊन काठावर उभा आहे.ज्यामध्ये तो नोटा ठेवत आहे.पैशांच्या या लुटीचा व्हिडिओ वेगाने शेअर होत आहे.हे रुपये खरे आहेत की खोटे,याची खात्री सध्या पोलिसांना करता आलेली नाही.या नोटा खऱ्या असल्याची स्थानिक लोकांमध्ये चर्चा असली तरी त्यावर ते उघडपणे बोलत नाहीत.मफसिल पोलिस स्टेशनचे इंचार्ज रिझवान अहमद यांनी सांगितले की,नोटा मिळाल्याच्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी गेले होते,तेथे काहीही आढळले नाही.कालव्यात नोटा मिळाल्याबद्दल लोक बोलत आहेत.पुढील तपास सुरू आहे.