सिताराम पोकळे यांनी आपले आयुष्य पत्रकारितेला समर्पित केले-आमदार बाळासाहेब आजबे
'संघर्ष यात्री' गौरव ग्रंथ प्रकाशन प्रसंगी मान्यवरांच्या गौरोद्गार
क्लिक2आष्टी अपडेट-लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्राला स्वतःला वाहून घेत गेल्या तीन दशकापेक्षा अधिक काळ ते लेखणीची झुंजत राहिले.आष्टी तालुक्याच्या विविध क्षेत्राशी निगडित लेखणी चालवत त्यांनी जाज्वल्य क्रांतिकारक इतिहास निर्माण केला आहे.जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे यांनी आपले आयुष्य पत्रकारितेला समर्पित केले असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले.
आष्टी येथील पंचायत समिती सभागृहामध्ये मंगळवार दि.९ रोजी तालुक्याच्या पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे यांचा ६७ वा. वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांच्यासह.पञकार सिताराम पोकळे यांचे वर्गमिञ,पत्रकार,लेखक,कवी यांनी त्यांच्या जीवनावर लिहिलेल्या “संघर्ष यात्री तत्त्वनिष्ठ पत्रकारितेची पन्नाशी “या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आ. बाळासाहेब आजबे यांनी सिताराम पोकळे हे कार्यात व्यस्त असणारे व्यक्तिमत्व असून आजही या वयामध्ये देखील ते उत्कृष्ट लेखन करतात असे सांगितले.यावेळी उपस्थित संतोष दाणी, उत्तम बोडखे, दत्ता काकडे, सय्यद अल्लाउद्दीन, विक्रम पोकळे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,अनंत हंबर्डे,भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव मस्के,विजय गोल्हार,सौ.प्रज्ञा खोसरे माजी आ.साहेबराव दरेकर यांनी यावेळी पोकळे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश हळीकर हे होते.या कार्यक्रमास दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीपराव खिस्ती,सुराज्यचे संपादक सर्वोत्तम गावस्कर, बी.एन.मुटकुळे,बन्सीभाऊ पोकळे,विष्णुपंत वायभासे, डॉ.आजिनाथ पोकळे, प्रा. रामकृष्ण हंबर्डे, एन.टी. गर्जे ,शिवाजी नाकाडे, पत्रकार मिलिंद देशमुख, आण्णासाहेब साबळे ,शरद तळेकर, प्रवीण पोकळे,सौ.संगीता पोकळे आदीसह आप्तेष्ट मित्र नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सत्कारमूर्ती सिताराम पोकळे यांनी पत्रकारिता करत असताना घडलेले अनेक राजकीय व सामाजिक किस्से सांगितले.राजकीय, सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात ते संघर्षमय जीवन जगले.त्यांचे वर्गमित्र, आप्तस्वकीय,पत्रकार मित्र व इतरांनी त्यांच्या सहवासातील प्रसंग व आठवणी शब्दरूपाने कागदावर उतरवल्या आहेत. १९७३- ७४ पासून ते पत्रकार म्हणून कार्यारत आहेत.त्यांच्या पत्रकारितेचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावरील संग्रहित लेखांचे ‘संघर्ष यात्री.तत्त्वनिष्ठ पत्रकारितेची पन्नाशी’ हे पुस्तक मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशित करण्यात आले.त्यावेळी मंचावर मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी पत्रकारितेचे दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी संतोष दाणी,प्रा.सय्यद अल्लाउद्दिन,उत्तम बोडखे,विक्रम पोकळे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,साहेबराव म्हस्के, विजय गोल्हार,दत्ता काकडे,अनंत हंबर्डे,सौ.प्रज्ञा खोसरे – पोकळे यांचे मनोगत झाले.आष्टीतील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे आणि उत्तम बोडखे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने ‘रंगाई’ प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन झाले.बीड येथील दैनिक लोकप्रश्न या वृतपत्राचे संपादक दिलीपराव खिस्ती यांच्या शुभहस्ते पुस्तक तर प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महाव्यवस्थापक सुरेश हळळीकर हे होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,प्रा.सुशिलाताई मोराळे, ॲड.प्रज्ञा खोसरे पोकळे,दत्ता काकडे,अनंत हंबर्डे,नरेंद्र कांकरिया,अनिल लगड, सुनिल क्षीरसागर,सर्वोत्तम गावरसकर हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ॲड.साहेबराव म्हस्के,आजिनाथ सानप,एन.टी.गर्जे, चेअरमन शांतीलाल भोसले,आण्णासाहेब चौधरी,विक्रम पोकळे,डॉ.ए.आर.पोकळे,बन्सीभाऊ पोकळे,प्रा.सय्यद अलाउद्दीन,तात्यासाहेब शिंदे,बी.एन.मुटकुळे, देविदास पोकळे,रणजित पोकळे,शरद तळेकर,गणेश दळवी, आण्णासाहेब साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रकाशन सोहळ्यास ॲड.सीताराम पोकळे यांचे नातेवाईक,मित्र परिवार,व्यापारी,पत्रकार,कार्यकर्ते यानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आष्टी तालुका वकील संघ व सर्व पत्रकार संघटनानी परिश्रम घेतले.संचलन राजेंद्र लाड यांनी तर आभार सीताराम पोकळे यांनी मानले.