महाराष्ट्राच्या सत्तासंघार्षावर उद्या फैसला;जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार
क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे.या निकालासाठी महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.उद्या जर या प्रकरणी फैसला झाला तर कुणाच्या पारड्यात निकाल जाईल हे लवकरच समजणार आहे.दोन महत्वाचे निकाल उद्या लागणार आहे असे सांगण्यात आले आहे तसे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे.
या सोळा आमदारांवर आपञेची टांगती तलवार
एकनाथ शिंदे,संदीपान भुमरे,अब्दुल सत्तार,तानाजी सावंत,संजय शिरसाट,यामिनी जाधव,चिमणराव पाटील, भरत गोगावले,लता सोनावणे,रमेश बोरणारे,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर,महेश शिंदे,अनिल बाबर,संजय रायमुलकर,बालाजी कल्याणकर या आमदारांवर आपञेची टांगती तलवार आहे.