मुली बद्दल अपशब्द बोलतो म्हणून जाब विचारणा-या आईला मिरची टाकून हानले;अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल
क्लिक2आष्टी अपडेट-मुलीबद्दल अपशब्द बोलत असल्याने आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईला व इतरांना डोळ्यात मिरची टाकून मारहाण केल्याची घटना आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे घडली असून अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील देवळाली पाण्याची येथील मुनाब्बी भ्र हुसेन सय्यद (वय ५०) ह्या आपल्या मुलीबद्दल अपशब्द वापरत असलेल्या हनीफ चुन्नीलाल पठाण,मेहरून भ्र हनीफ पठाण,सानु हानिफ पठाण,गुड्डी हानीफ पठाण रा.सर्व देवळाली पाण्याची येथील राहत्या घरी दि.९/५/२०२३ रोजी दुपारी दोन च्या सुमारास मुनाब्बी पठाण ह्या आपल्या मुलीला अपशब्द वापरत असून याचा जाब विचारण्यासाठी वरील पठाण यांच्या घरी गेले असता पठाण यांनी चौघांनी संगनमताने चटणी टाकून सय्यद व साक्षीदारांना लाथा बुक्कांनी व लोखंडी कु-हाडीने मारहाण करत गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी हनीफ चुन्नीलाल पठाण,मेहरून भ्र हनीफ पठाण,सानु हानिफ पठाण,गुड्डी हानीफ पठाण या चौघांविरोधात गुरंन ८०/२०२३ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भा.द.वि नुसार अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल झालााअसून,पुढील तपास पोलिस नायक कांबळे हे करित आहेत.