सरपंच पती सावता ससाणेची दादागीरी;रस्त्याच्या कामासांठी फळबागेतून घातले जेसीबी,ट्रॅक्टर
आष्टी पोलिसांत तक्रार दाखल
क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यातील टाकळी अमीया येथे स.नं.१९० मध्ये रस्त्याच्या कामांसाठी चक्क फळबागेतून रस्ता काढत फळबागेचे नुकसान केले.याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतक-याला सरपंच पती सावता ससाणे याचासह इतर चार जणांनी आरेरावी करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार आष्टी पोलिसांत दाखल केली आहे.
आष्टी पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या कडा पोलिस चौकीत टाकळी अमिया येथील शेतकरी अजित जालिंदर शेंडगे (वय२६) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की,दि.१२/५/२०२३ रोजी सकाळी ९ वा.मी माझे शेत सर्व्हे नं.१९० मधील संञाची फळबाग लावलेली असून,त्याची पाहणी करण्यासाठी गेलो.तर मला त्याठिकाणी मी फळबागेला पाणी देण्यासाठी केलेले ठिबक व फळबागेची झालेली नुकसान दिसून आले.याबाबत मी माझा चुलत भाऊ आकाश अंकुश शेंडगे याला विचारले असता त्याने मला सांगितले की काल दि.११ रोजी राञी ९ च्या सुमारास मी माझ्या शेतात पाईप आणण्यासाठी गेलो असता तेथून ट्रक्टर,जेसीबी तुझ्या संञाच्या शेतीतुन सावता विठ्ठल ससाणे,अमोल बाबासाहेब भूकन,अशोक गोरख एकशिंगे यांना घेऊन जातांना पाहिले असल्याचे त्याने सांगितले.यावर मी वरिल सरपंच पती सावता ससाणे व इतर दोघांजणांना विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी मला आरेरावीची भाषा करत हा तुझ्या शेतातून आम्हीचु ट्रक्टर आणि जेसीबी नेऊनू तुझ्या पाईपलाईन अन् फळबागेचे आम्हीच नुकसान केले.तु आमच्या नादाला लागला तर तुला जीव मारून टाकू असे म्हणून तिथून निघून गेले असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.