व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.धसांनी कार्यकर्त्यांला सभापती तर माजी आ.धोंडे यांनी भावाला बनविले उपसभापती

सभापती पदी तांबोळी तर उपसभापती धोंडे यांची निवड

0

क्लिक2आष्टी अपडेट-कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार सुरेश यांनी आपल्या कार्यकर्तेला म्हणजे रमजान तांबोळी तर उपसभापतीपदी माजी आ.भीमराव धोंडे यांनी फुकटात मिळालेल्या तीन जागापैकी आपल्या भावाला नामदेव धोंडे यांना केल्याने तालुक्यात आ.धसांनी कार्यकर्तेला तर माजी आ.धोंडे यांनी भावाला उपसभापती पदी निवडी केल्याची चर्चा आहे.
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु समजली जाणारी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अविरोध झाली.रविवारी १४ मे रोजी सभापती,उपसभापती निवडी करण्यात आल्या.या बाजार समितीमध्ये आ.सरेश धस यांच्याकडे १२ संचालक,आ.बाळासाहेब आजबे तीन,माजी आ.भीमराव धोंडे तीन संचालक आहेत.वीस वीस महिने पदांची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
आजपर्यंत यांनी भूषवली सभापती पदे
बाबासाहेब पाटील,बाबुराव फाळके,शिवाजी सुरवसे, विजयकुमार बांदल,बाबासाहेब आंधळे,लक्ष्मण नन्नवरे, संजय ढोबळे,अशोक ढवण,काकासाहेब थेटे,रमजान तांबोळी,शत्रुघ्न मरकड,दत्तात्रय जेवे हे बारा सभापती यांनी हे पद भूषवली आहेत.
साहेबांनी भावाची लावली वर्णी…!
आमदार सुरेश धस यांनी सत्ताधारी विरोधकांना एकञ घेऊन हि बाजार समिती बिनविरोध काढली यामध्ये माजी आ.भीमराव धोंडे यांचे तीन सदस्य असून त्यात एक सदस्य म्हणून आपल्या बंधूची निवड केली.एवढ्यावरच न थांबता उपसभापती पद हे माजी आ.धोंडे यांच्या गटाला भेटले त्यांनी तिथेही आपल्या भावालाच पद दिल्याची चर्चा शेतक-यांत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.