अहमदनगर मध्ये दोन गटात दगडफेक;पोलिस कर्मचारी जखमी,वाहनांचे नुकसान
१०२जणांवर गुन्हे दाखल ४५ जणांना घेतले ताब्यात
क्लिक2आष्टी अपडेट-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये रविवारी (दि.१४) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.तर, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.तर,४५ जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल रविवार दि.१४ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती.ही मिरवणूक रात्री आठ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. याचदरम्यान अफवेमुळे दोन गटात वाद झाला. सुरूवातीला एका गटातील एकाने दगड भिरकावला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही दगडफेक सुरू केली. दोन्ही गटांच्या आक्रमकपणामुळे घटनास्थळी नंतर तुफान दगडफेक झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.दगडफेक सुरू असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र,या दरम्यान 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले.तसेच, काही युवकही जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गटात नेमका वाद कशामुळे झाला? माञ दगडफेकीचे कारण अध्यापही समजू शकले नाही.