दोन लाख घेऊन बायको केली अन् ती अजून दोन लाख घेऊन पळून गेली;बीड जिल्ह्यातील येथील प्रकार
पत्नी,सासू,सासरा,मेव्हण्या विरोधात गून्हा दाखल
क्लिक2आष्टी अपडेट-लग्न होत नाही म्हणून एका मुलीचा ठेपा लागला दोन लाख रूपये नवरी मुलीच्या घरी देऊन बायको केली,काहि दिवस ती राहिली अन् ७० हजाराचे दागिने अन् १ लाख २० हजार रोख असे ऐवेज घेऊन पळून गेली याबाबत फसवणूक झालेल्या नवरदेवाने पोलिस ठाणे गाठून सासू,सासरा व मेव्हण्याविरोधात बीड येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बीड येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात नितीन किरण उबाळे (वय ३२) वर्ष रा.बीड याने दोन लाख रूपये देऊन मुंबई येथील आशा उर्फ आश्विनी किरण उबाळे हिच्याशी लग्न केले.मुलगी काहि दिवस व्यवस्थित राहिल्यानंतर एक दिवस तिची आई तिला भेटण्यासाठी बीड येथे आली.त्यानंतर दोघींनी घरातील ७० हजार रूपायांचे दागीने व १ लाख २० हजार रोख घेऊन थेट मुंबई गाठली.परंतु वारंवार फोन करूनही पत्नी नादायला येत नाही व आगोदर दिलेले दोन लाख रूपयेही देण्यास नकार देत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने शिवाजी नगर पोलिस ठाणे गाठून पत्नी आशा उर्फ आश्वीनी किरण उबाळे,सासरा थोराजी दिंगाबर गंगधडे,सासू सविता थोराजी गंगधडे,मेव्हणा शिवाजी थोराजी गंगधडे सर्व रा.महत्मा गांधी नगर रबाळे पोलिस ठाण्याच्या मागे पाठिमागे नवी मुंबई येथील रहिवासी असून यांच्या विरोधात शिवाजी नजर पोलिसांत गुरनं.२५१/२०२३ कलम ४२०,५०४,५०६,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहे परजणे हे करत आहेत.