१५ धावांनी विजय मिळवत गुजरातला हरवून।? चेन्नई फायनलमध्ये,गुजरात ऑलआऊट
क्लिक2आष्टी अपडेट-आयपीएल १६ मधील क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरात टायटन्सला (GT) धावांनी हरवत फायनलमध्ये धडक दिली.चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला २० षटकांत सर्व गडी गमावून १५७ धावाच करता आल्या.
गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४२ धावा केल्या.त्यानंतर राशिद खानने ३०, दसुन शनाकाने १७, विजय शंकरने १४, तर वृद्धिमान साहाने १२ धावा केल्या.तर चेन्नईकडून दीपक चहर,महीश तीक्षणा,रविंद्र जडेजा, मथीषा पथिरानाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.तर तुषार देशपांडेने १ विकेट घेतली. तत्पूर्वी गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी बाद १७२ धावा करत गुजरातला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले.याचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर वृद्धिमान साहा तिसऱ्या षटकात १२ धावांवर बाद झाला.दीपक चहरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात महीश तीक्षणाने हार्दिक पंड्याला ८ धावांवर बाद केले.तर अकराव्या षटकात रविंद्र जडेजाने दसुन शनाकाला १७ धावांवर बाद केले. त्यानंतर तेराव्या षटकात रविंद्र जडेजाने डेव्हिड मिलरला ४ धावांवर आऊट केले. तर पुढच्याच षटकात दीपक चहरने शुभमन गिलला ४२ धावांवर आऊट केले.तर पंधराव्या षटकात तीक्षणाने राहुल तेवतियाला ३ धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात मथीषा पथिरानाने विजय शंकरला १४ धावांवर बाद केले. याच षटकात दर्शन नलकांडे शून्यावर धावबाद झाला. तर पुढच्याच षटकात तुषार देशपांडेने राशिद खानला ३० धावांवर आऊट केले. यानंतर नूर अहमद आणि मोहम्मद शमीने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाची धावसंख्या १५७ वर नेली.शमी शेवटच्या चेंडूवर आऊट झाला.