व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेत जमिनीच्या वादावरून दोन गटात हाणामारी;परपस्परांविरोधात ११ जणांवर गुन्हा दाखल

आष्टी तालुक्यातील शिदेवाडी येथील घटना

0

क्लिक2आष्टी अपडेट-शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या शिंदेवाडी येथील स.नं.१०२ या जमिनीचा वाद आष्टी न्यायालयात न्यायप्रविष्ट असून,कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल परंतु त्या आगोदरच या परमेश्वर गोरख पवार व परमेश्वर बयाजी काकडे यांचे वाद होऊन दोघांनीही एकमेकांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,परमेश्वर गोरख पवार यांच्या फिर्यादीवरून मी शेतात असतांना मला आमच्या चुलत्याची जमिन का घेतली म्हणत सचिन शिवाजी काकडे,शिवाजी बयाजी काकडे,रमेश नामदेव पवार,संतोष परमेश्वर काकडे,गणेश उर्फ बालू परमेश्वर काकडे रा.सर्व शिदेवाडी येथील असून,यांनी लाथा बुक्कांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.तर यांच्या विरोधात परमेश्वर बयाजी काकडे यांच्या फिर्यादीवरून अमोल बबन दरेकर,संतोष बाळू पवार,परमेश्वर गोरख पवार,शरद गोरख पवार,सुरज पांडूरंग खंडागळे,अक्षय पांडूरंग खंडागळे,अर्चना शरद पवार रा.सर्व शिदेवाडी यांनी सदरील जमिनीचा कोर्टात वाद सुरू असून,तुम्ही जमिन नांगरू नको अरोपींनी जमवून शिवीगाळ करत काठीने लाथा बुक्कांनी मार देत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.या परस्पर विरोधात आष्टी पोलिसांत ११ जणांवर गुरनं २१७/२०२३ व २१८/२०२३ कलम १४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६ भांदविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपार पोहेकाॅ.रामदासी हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.