व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सोपी पध्दत;आता घरबसल्या मोबाईलवरून बदला आधार कार्डवरचा पत्ता

ऑनलाइन होणार आधार कार्ड अपटेड

0
  • क्लिक2आष्टी अपडेट-आधार कार्ड आपल्या देशातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.त्यात तुमचे नाव,मोबाइल क्रमांक,पत्ता आदी सर्व माहिती बरोबर असणे आवश्यक आहे.अनेकदा असे दिसून येते की,शहर किंवा पत्ता बदलल्यानंतर लोकांना ते आधारमध्ये अपडेट करता येत नाही.त्यांना ते त्रासदायक वाटते.पण तसे नाही.
    आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.तुम्ही ते घरबसल्या ऑनलाइन अपडेट करू शकता.यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
    ॲड्रेस प्रूफसह आधारमधील पत्ता अपडेट कसा करायचा?
    १).सर्व प्रथम UIDAI
    myaadhaar.uidai.gov.in/ च्या अधिकृत साइटला भेट द्या.
    २).लॉगिन करण्यासाठी तिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून Send OTP वर क्लिक करा.
    ३) त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट करा. लॉग इन करा.
    ४)आता आधार अपडेट पर्यायावर जा. त्यानंतर Proceed to Aadhaar Update या पर्यायावर क्लिक करा.
    ५)त्यानंतर पुढील पेजवर पत्ता निवडा व Proceed to Aadhaar Update या पर्यायावर क्लिक करा.
    ६)असे केल्याने तुमचा सध्याचा पत्ता तुमच्या समोर येईल.
    ७)त्यानंतर,तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या पत्त्याचा पर्याय येईल.
    ८)येथे तुम्हाला तुमच्या नवीन पत्त्याची माहिती भरावी
    लागेल.
    ९)त्यानंतर,एक कागदपत्र सबमिट करावे लागेल,ज्यावर तुमचा पत्ता असेल.
    १०)तुम्हाला खालील दोन्ही चेक बॉक्सवर क्लिक करून Next वर क्लिक करावे लागेल.
    ११)आता पेमेंटचा पर्याय तुमच्या समोर येईल.तिथे तुम्ही UPI नेट बँकिंग किंवा कार्डाची निवड करून पेमेंट करता येईल.
    १२)पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला पावती मिळेल.त्यानंतर,तुमचे आधार 30 दिवसांत अपडेट केले जाईल.
    कागदपत्रांशिवायही पत्ता अपडेट करता येतो.
    UIDAI कुटुंब प्रमुखाच्या (Head Of Family) परवानगीने आधारमध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा देखील प्रदान करते.या अंतर्गत,ऑनलाइन आधार अॅड्रेस अपडेटसाठी घराचा प्रमुख आपल्या मुलाचा,जोडीदाराचा,पालकांचा पत्ता मंजूर करू शकतो.१८ वर्षांवरील कोणीही HOF असू शकते.

    अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

    १)सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जा.
    २)होय,लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
    ३) यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट करा आणि लॉग इन करा.
    ४)त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन अपडेट सर्व्हिसचा पर्याय मिळेल, तो निवडा.
    ५)त्यानंतर तुम्ही हेड ऑफ फॅमिली (HOF) आधारित आधार अपडेटवर क्लिक करा.
    ६)यानंतर तुम्हाला कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
    ७)त्यानंतर तुम्हाला 50 रुपये सर्व्हिस चार्ज भरावा लागेल.
    ८)यानंतर HOF ला पत्ता अपडेट करण्याची विनंती पाठवली जाईल.
    ९)यानंतर HOF ला त्याची परवानगी द्यावी लागेल.
    १०)HOF ने पत्ता शेअर करण्याची विनंती नाकारली तर तुमचा आधार पत्ता अपडेट केला जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.