भारतीय जैन संघटनेचे कार्याने शेतशिवाराची सुपिकता वाढविणार-आ.सुरेश धस
महाराष्ट्रात पाण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या खांद्याला खांदा लाऊन सरपंच परिषद काम करेल-दत्ताभाऊ काकडे
क्लिक2आष्टी अपटेड-भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ह्या योजनेने शेत शिवाराची सुपिकता वाढविणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.तर पुढच्या पिढीला पाणी मिळविण्यासाठी आत्तापासूनच आपण निसर्गाचा समतोल राखत वृक्षवाढ व पाणी बचत करणे गरजेचे आहे.अन् हे पाण्याचे महत्व आणि पाणी बचत करण्याचे काम भारतीय जैन संघटना करत आहे.व या कामात भारतीय जैन संघटनेच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात सरपंच परिषद संघटना काम करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केले आहे.
भारतीय जैन संघटना आष्टी तर्फे गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार प्रचार रथाचा शुभारंभ आ.सुरेश धस यांच्या हस्ते आज दि.३१ रोजी सकाळी ११.३० करण्यात आला.या प्रचार रथाचे उद्याटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुखलाल मुथ्था,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,नगरसेवक तथा गटनेते किशोर झरेकर,सुनिल रेडेकर,नागेबाबा मल्टीस्टेटचे शाखाधिकारी संदिप टेकाडे,व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष शेखर मुथ्था,सचिव प्रितम बोगावत,नवनित कटारिया,गिरीष महाराज जोशी,चेतन मेहेर यांच्यासह व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,भारतीय जैन संघटनेचे कार्य किल्लारीचा भूंकप झाल्यापासून सर्वांना माहित आहे.त्यांनी आता गाळमुक्त धरण योजना हाती घेतली आहे.यामुळे प्रत्येक शेतशिवाराची सुपिकता वाढविण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हासमन्वक दिपक गर्जे यांनी केले.तर सुञसंचालन विजय बोगावत यांनी करून आभार मानले.
प्रचार रथाचे प्रायोजक श्री संत नागेबाबा
भारतीय जैन संघटनेच्यावतीने तालुक्यात सर्व गावात प्रचार रथ फिरविण्यासाठी लागणा-या वाहनाचा व डिजीटल बॅनरचा खर्च श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने करण्यात आले होते.