व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खुंटेफळ प्रकल्पात हे घेतलेले गुंठे कुणाच्या नातेवाईकाचे-आ.धस यांनीच सांगावे आमदार आजबेंनी दाखविले पुरावे

0

क्लिक2आष्टी अपडेट-खुंटेफळ साठवण प्रकल्पात मी अडकाठी आणून ह्या प्रकल्पाला विरोध केला.आणि माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावावर खुंटेफळ साठवण प्रकल्पात एक गुंठा जमिन दाखवा असे अवाहन आ धस यांनी केले होते,तर या साठवण तलावात महेश नवनाथ शिंदे,गणेश नवनाथ शिंदे(मामाचे मुले),नवनाथ बापुराव शिंदे(मामा),अन् मोहन हौसराव झांबरे हे कुणाचे नातेवाईक आहेत.हे मलाच नाही तर सा-या तालुक्याला माहित आहेत.आता आमदार धस साहेबांनीच सांगितले की मी आमदारकी लढणार नाही असे सांगितले होते.आता या पुराव्यावर त्यांनी आमदारकी लढायची का?नाही त्यांनी ठरवावी मी म्हणणार नाही की,तुम्ही येणारी २०२४ ची विधानसभा लढा किंवा लढू नका असा आ.धसांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतांना आ.बाळासाहेब आजबे यांनी उत्तर दिले आहे.
शिराळ येथील आजबे यांच्या फार्म हाऊसवर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आमदार धसांना उत्तर देतांना आ.आजबे बोलत होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,खुंटेफळ तलावाला विरोध करणारे आम्ही नसून,आत्ता जे १७ कोटी रूपये शेतक-यांना मिळाले ते तपासून पाहा यातील मुळ शेतकरी कोण आहेत.जर तीन गुंठ्याला ३८ लाख मिळत असेल तर त्या प्रमाणात मुळ शेतक-यांना का?नाही मिळत.संजय रामचंद्र पवार यांची २८ गुंठ्याला १ कोटी २८ लाख कसे मिळाले हे कोणाचे नातेवाईक आहेत.ते तपासून पहा,अन् अता २८/३/२०२३ ला दुध संघातील कर्मचारी असलेला मोकाशे यांनी २८ लाखाची जमीन कशी घेतो.आता मला लई उलगडा करायला लाऊ नका जर आम्ही तोंड उघडले तर तुमची पळता भोई थोडी होईल.तसेच महाविकास आघाडीचे सरकार गेलेले १२ महिने झाले त्या १२ महिन्यात तुम्ही या खुंटेफळ साठवण प्रकल्पाची निविदा का?काढली नाही.फक्त मी आता सत्तेत सहभागी झालो तर तुम्ही लगेच पेपरला बातम्या देऊन पंधरा दिवसात निविदा काढणार असल्याची घाई का? केली तर त्यांना माहित आहे की,आता मी खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांना कळून चुकले आहे,मी या कामाचे श्रेय घेईल असे वाटले.पण मला या कामांचे श्रेय घेयचे नाही हे सर्व तुम्हाला लकलाभ,राहिला प्रश्न आमदारकीचा तर हा काय?माझा पिढी जात धंदा नाही.तुमच्या सारखा काय माझी आमदारकीवर पिढीजात मत्तेदारी नाही.लोकांना वाटलं तर निवडून देतील नाही तर देणार नाहीत.
आता आमचे पोरं शिकले म्हणून त्यांना आम्ही इंजिनीरींग केलेल्या मुलांना पेव्हींग ब्लाॅकचा व्यावसाय टाकून दिला तर गैर काय?आता त्यांना काय दारूचे दुकान किंवा पत्ताचे क्लब टाकून द्यावे का असेही त्यांनी सांगितले.
राम खाडेची भिती वाटती तर देवस्थानच्या जमिनी घेता कशाला
तुम्ही पञकार परिषद घेऊन सांगता की राम खाडेला मी तक्रारी करायला लावतो तर मला राम खाडेच्या पाठीमागे राहून करायची गरज काय?पण आम्ही तुम्हाला म्हणालोत का? देवस्थानच्या जमिनी तुमच्या नावावर करा,तुम्हाला जर राम खाडेची एवढी भिती वाटती तर देवस्थानच्या जमिनी का?खातात.
शिराळ च्या जमिनीच्या कागदपञे तपासणीच्या भानगडीत पडू नका
दादेगांव देवस्थानची शिराळ येथे असलेल्या ७०० एकर जमिन असून,ह्या जमिनीचा शेत सारा आम्ही दर वर्षी भरतोत.यातील एकही गुंठा माझ्या किंवा कुटूंबातील व्यक्तीच्या नावे नाही.अन् याचे कागदपञे तपासणीची गरज नाही.अन् त्या भानगडीत पडू नका असा सल्लाही आमदार आजबे यांनी आ.धसांना दिला आहे.
पाण्यासाठी सास-यांचा संघर्ष सर्वांना माहित आहे
माझे सासरे बलभीम सुंबरे यांचे तालुक्याला पाणी मिळावे म्हणून,त्यांचा संघर्ष काय आहे.त्यांनी कुकडीचे पाणी मिळावे म्हणून किती निवेदन दिले.अन् त्यांनी दाखल केलेली निविदा ही २०१४ ला खारीज केली आहे.याची माहिती घेऊन आमदार धस साहेबांनी बोलावे असा सल्लाही आ.आजबे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.