व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खुंटेफळ साठवण प्रकल्पाचा आमदार आजबेंचा आभ्यास काय ?आमदार सुरेश धसांचा सवाल

0

क्लिक2आष्टी अपडेट-खुंटेफळ प्रकल्पात खुंटेफळ या गावचे ४०० मुळ खातेदार असून ७०० झाले तर कुंभेफळ हे त्या प्रकल्पाच्या शेजारीच गाव असल्याने तिथे देखील मुळ ३०० चे ६०० झाले.हे का?झाले तर दोन्ही गावात मराठा समाज जास्त असल्याने अरक्षण नाही, नोकरी नाही म्हणून प्रकल्प होतोय,स्वत;चं घरदार जातयं म्हणून मी च त्यावेळेस २०१२ साली या गावातील शेतक-यांना खातेफोड करण्याचे सांगितले.याऊपर लोकांनी आणखी पुढची शक्कल हि प्रकल्पग्रस्त जमिन मुली-बाळींच्या नावे केली.जेणे करून किमान नातेवाईकांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपञ मिळेल.कारण शासन निर्णय असा आहे २०० स्वेअर फुट जरी जागा प्रकल्पग्रस्त भागात असेल तर त्या व्यक्तीला प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपञ मिळेल.याचा आभ्यास आमदारा महोदय यांनी करण्याची गरज असून,या प्रकल्पाची अर्धवट माहिती देण्याची गडबड आ.आजबे यांनी करू नये,असा सल्ला आमदार सुरेश धस यांनी आ.आजबे यांना दिला.


काल आष्टीच्या आमदार बाळासाहेब आजबे यांनी पञकार परिषद घेऊन,आमच्या मामा,मामाचे मुले,मोहन झांबरे यांच्या नावे जमिन असल्याचे दाखविले पण ही जमिन किती आहे.हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपञ मिळण्यासाठी अर्धा-अर्धा गुंठा जमिन नावावर सन २०१२ लाच केल्या आहेत.आमदार साहेब आमच्या नातेवाईकांकडे १००-५० एकर जमिन आहे का?उगीच अर्धा-अर्धा गुंठाचे उतारे दाखवून या गोष्टीचा बाऊ करू नये,आम्ही या प्रकल्पासाठी लोकांना दगडे मारले नाहीत.तर उलट माझ्यावरच लोकांनी दगडे मारले आणि लोकांनी दगडे मारले असती तर या गावातील लोकांनी १५१ हेक्टर जमिन कशी दिली.कारण हे सर्व प्रकरण आम्ही व गावक-यांनी हाताळून मिटवून घेतले. या कामासाठी गावक-यांनी देखील पुढाकार घेत सहकार्य केले.व आता पंधरा दिवसात या प्रकल्पाची बी-१ निविदा निघणार असून,या कामाची लवकरच सूरूवात होऊन प्रकल्प पुर्ण होणार आहे.व १.६८ टिएमसी पाण्याचे श्रेय आमदार आजबे यांनी घेण्याचे काहिच कारण नसल्याचेही आ.धस यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.