तालुक्यात उत्साहात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवदिन साजरा
क्लिक2आष्टी अपडेट-
——————————————
तहसिल कार्यालय
आष्टी-स्वातंञ्य अमृत महोत्सा निमित्ताने आष्टी तहसील आवारात शासकीय मुख्य ध्वजारोहण तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,मा.आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,सरपंच परिषदेचे प्रदेशध्यक्ष दत्ता काकडे,माजी जि.प.सदस्य देविदास धस,राम खाडे,कैलास दरेकर,बलभीम सुंबरे,नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांच्यासह सर्व राजकीय पदाधिकारी,अधिकारी,तहसिल कर्मचारी यांच्यासह आदि उपस्थित होते.आभार तहसिलदार गायकवाड यांनी मानले.
फिनिक्स इंटरनॅशनल स्कुल
आष्टी-येथील फिनिक्स इंटरनॅशनल स्कुल मध्ये स्वातंञ्य दिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा सिमा कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी शाळेचे प्रचार्य नागसेन कांबळे,संतोष पादरे,यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
न्यू आष्टी रेल्वे स्टेशन
आष्टी-येथे नव्याने सुरू झालेले न्यू आष्टी रेल्वे स्टेशनचा न्यू आष्टी-अहमद नगरचे या रेल्वे च्या शुभारंभा प्रसंगी पहिला प्रवासी ठरलेले प्रितम विजय बोगावत यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी न्यू आष्टी स्टेशनचे टिकीट हाॅल्ट एजंट गणेश दळवी,चिंचाळा सरपंच अशोक पोकळे,पञकार शरद रेडेकर,पञकार सचिन रानडे यांच्यासह रेल्वे कर्मचारी,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपंचायत कार्यालय
आष्टी-येथील नगरपंचायत येथे सकाळी 7 वा.
15 मी.नगराध्यक्ष आयशा इनायतुल्ला बेग यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी मुख्यअधिकारी बाळदत्त मोरे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,नगरसेवक किशोर झरेकर,भारत मुरकुटे,रंगनाथ धोंडे,सुनिल रेडेकर,शेख शरीफ,अक्षय धोंडे,अस्लम बेग,नाजीम शेख,
शाम वाल्हेकर,ज्ञानेश्वर राऊत,इरषान खान, कार्यालयीन प्रमुख प्रकाश हरकळ प्रशाकीय अधिकारी अजिनाथ गिते,यांच्यासह सर्व अधिकारी,कर्मचारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
ग्रामिण रूग्णालय आष्टी
आष्टी-येथील ग्रामिण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.राहुल टेकाडे यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामदास मोराळे, डॉ.बालाजी गुट्टे,डॉ.संतोष जावळे,सहाय्यक अधिक्षक सी.डी.मिसाळ यांच्यासह सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
उप कोषागार कार्यालय
आष्टी-येथील उप कोषागार कार्यालयात 7.20 वाजता एस टी ओ बिनवडे यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी पंडीत,गणेश दळवी यांच्यासह आदि उपस्थित होते.
अनिषा ग्लोबल स्कूल
आष्टी-येथील श्री.पिंपळेश्वर महादेव देवस्थान संचलित अनिषा ग्लोबल स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन जोशात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देशभक्तीपर गिते सादर केली.देशभक्तीपर गितावर न्रुत्य सादर केले.विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण भाषणांनी वातावरण देशभक्तीपूर्ण झाले होते.कार्यक्रमास श्री.पिंपळेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष मा.आ.श्री.सुरेश धस, अनिषा ग्लोबल स्कूलच्या डायरेक्टर सौ.प्राजक्ताताई धस,श्री.पिंपळेश्वर महादेव देवस्थानचे सर्व ट्रस्टी मेंबर्स,उपप्राचार्य श्री.जैस जोसेफ,शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.