पोलिस हल्ल्याच्या निषेधार्थ आष्टी,कड्यासह तालुका कडकडीत बंद; तरुणांनी मुंडण करून केला निषेध
आष्टी छ.शिवाजी महाराज चौकात दिल्या सरकार विरोधी घोषणा
क्लिक2आष्टी अपडेट-जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीमार केला याच्या निषेधार्थ आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टी बंदचे अहवान केले होते. या अहवानाला आष्टी,कडा सह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवत आष्टी तालुका शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला.दरम्यान सकाळी शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा झाले.यावेळी जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत घोषणाबाजी केली. त्याबरोबर काही युवकांनी मुंडण केले.
आष्टी येथील मराठा समाजासह इतर समाजातील नागरीक सकाळी १० वा.जमा झाले.यावेळी तरूणांनी पोलिसांनी केलेल्या लाठी हाल्याच्या निषेधार्त घोषणा देत मुंडण करत निषेध केला.यावेळी आरक्षण आमच्या हाक्काचे,नाही कुणाच्या बापाचे..!,कोण म्हणतं देत नाही,घेतल्याशिवाय राहत नाही यासह आदि घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.