व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जालन्यातील घटनेची मी माफी मागतो;उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी

0

क्लिक2आष्टी अपडेट-जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा होता.या घटनेबद्दल मी क्षमायाचना करतो.क्षमा मागतो, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त करत माफी मागितली.
मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पाडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले,छत्रपती संभाजीराजेदेखील उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालन्यात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. अशा प्रकारे बळाच्या वापराचे समर्थन करता येऊ शकत नाही. मी यापूर्वीही राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. युती सरकारमध्ये गृहमंत्री असताना राज्यात 2 हजार आंदोलन झाले. परंतू कधीची बळाचा वापर झाला नाही.देवेंद्र फडणवीस म्हणाले,आतादेखील जालन्यात आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे काहीही कारण नव्हते.पण,जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती.हल्ल्यात निष्पाप नागरिक जखमी झाले.त्यांच्या प्रती शासनाच्या वतीने याठिकाणी मी क्षमा याचना करतो,क्षमा मागतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,जालन्यातील घटनेची उच्च चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.सरकार दोषींवर नक्कीच कारवाई करेल.दरम्यान,या घटनेवरून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला.हे अत्यंत दुर्दैवी होते.काही तर म्हणाले,लाठीहल्ल्याचा आदेश मंत्रालयातून दिला गेला.अशा प्रकारचे नॅरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न झाले.मात्र,लाठीहल्ला करण्याचे अधिकार हे एसपी,डीवायएसपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनाच असतात.त्यामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नसते.
निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, हे आरक्षण कोर्टात टिकले पाहीजे. आतापर्यंत ज्या राज्यांनी आरक्षणाची मर्यादा उल्लंघली त्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे.त्यामुळे हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. दरम्यान,मराठा समाजासाठी सरकारने आतापर्यंत काय काय धोरणात्मक निर्णय दिले, याची माहितीही फडणवीसांनी दिली. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला अनुदान देण्याचे काम सरकारने केले.त्यामाध्यमातून मराठा समाजातील गरजू तरुणांना रोजगार दिला जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.