व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘त्या बलात्कारी’ शिक्षकाला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

0

क्लिक2आष्टी अपडेट-आपल्याच शाळेतील सातव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधम न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली .

शिक्षकाला नांदेडच्या जिल्हा परिषद अनुदानित हायस्कूलच्या इयत्ता सातव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर याच हायस्कूलमधील विज्ञान विषयाचा माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जितेंद्र धोंडे या नराधम शिक्षकाने वेगवेगळे आमिष दाखवून सलग तीन दिवस लैंगिक अत्याचार केला होता.अखेर ४ सप्टेंबरलाजी म्हणजे शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर पीडितीच्या आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठून आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे याच्या विरुद्ध तक्रार दिली. त्यावरून कलम ३७६, पोस्को, अॅट्रासिटी अॅक्ट व विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती.जितेंद्र धोंडे यास नांदेडच्या न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत त्यास पोलिस कोठडी सुनावली उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांनी दिली.या घटनेने शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्यां घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.