व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपञ देणार;मुख्यमंञी शिंदे यांची घोषणा

0

क्लिक2आष्टी अपडेट-मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली. त्यानुसार जे महसुली,निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे.ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक इतर ज्या निजामकालीन नोंदी असतील. त्यांना कुणबी दाखले दिले जातील.अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर यासाठी आम्ही एक निवृत्त न्यायमूर्तीसंह पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे.आगामी महिन्याभरात ते त्यांचा अहवाल देतील.त्यानंतर पडताळणी करून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल,असेही ते म्हणाले.यासंदर्भातील जीआर लवकरच निघेल,असे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.
पुढे बोलतांना मुख्यमंञी एकनाथ शिंदे म्हणाले की,मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.ही आमची भूमिका आहे.त्यासाठी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी निवृत्त न्यायधीश संदीप शिंदे यांच्यासह पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे.तसेच इतर नोंदी निजामकालीन तपासणी,पडताळणी करणे त्याची एसओपी तयार करणे. त्यासाठी पूर्वीची कमिटी देखील मदत करेल.एक महिन्यात अहवाल सादर करेन. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील.संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.वैयक्तिक संवाद मुख्यमंत्र्यांशी साधला जाईल.त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती गठीत केली जाईल.
आम्ही सकारात्मक,जरांगे पाटलांकडून सहकार्याची अपेक्षा
मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे. यातून पूर्णपणे मार्ग काढूया यासाठी पूर्णपणे सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात देखील केस लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. सुप्रीम कोर्टात ज्या त्रुटी दाखवल्या आहेत.ते सादर करण्याचे काम हे सरकार करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,हे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी बैठका,चर्चा देखील झाल्या आहेत.टीकणारे मराठा आरक्षण दिल्याशिवाय आमचं सरकार स्वस्त बसणार नाही,अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.