आष्टीला उभारणार ३८ कोटी रूपायाचे कृषीपुरक क्षेञासाठी एमआयडीसी;राज्य मंञीमंडळाचा निर्णय
आष्टीचा व्यापार वाढीसाठी होणार फायदा
क्लिक2आष्टी अपडेट-मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरात पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी सुमारे 45 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली. यात सिंचनासाठी 27 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.तर या मंञिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी आष्टीला ३८ कोटी रूपायांची कृषीपुरक क्षेञासाठी एमआयडीसी उभारण्यासाठी मंजूरी मिळाल्याने आष्टीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असून,आता आष्टीच्या दोन्ही आमदारांनी हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.
याशिवाय राज्यातील नदीजोड प्रकल्पासाठी सरकारने 14 हजार कोटींच्या निधीची तरतुदी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. म्हणजेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 59 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा दिला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
याकामांसाठी आला निधी
जलसंपदा – 21 हजार 580 कोटी 24 लाख रुपये,-सार्वजनिक बांधकाम 12 हजार 938 कोटी 85 लाख,पशुसंवर्धन,दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय – 3 हजार 318 कोटी 54 लाख,नियोजन-1 हजार 608 कोटी 28 लाख,परिवहन-1 हजार 128 कोटी 69 लाख, ग्रामविकास – 1 हजार 291 कोटी 44 लाख, कृषी विभाग – 709 कोटी 49 लाख,क्रीडा विभाग – 696 कोटी 38 लाख, गृह – 684 कोटी 45 लाख, वैद्यकीय शिक्षण – 498 कोटी 6 लाख, महिला व बाल विकास – 386 कोटी 88 लाख, शालेय शिक्षण – 490 कोटी 78 लाख सार्वजनिक आरोग्य – 35.37 कोटी, सामान्य प्रशासन- 287 कोटी, नगरविकास- 281 कोटी 71 / लाख,सांस्कृतिक कार्य- 253 कोटी 70 लाख,पर्यटन – 95 कोटी 25 लाख,मदत पुनर्वसन 88 कोटी 72 लाख,-वन विभाग-65 कोटी 42 लाख, महसूल विभाग – 63 कोटी 68 लाख,उद्योग विभाग- 38 कोटी,वस्त्रोद्योग – 25 कोटी, कौशल्य विकास-10 कोटी,विधी व न्याय-3 कोटी 85 लाख जलसंपदा विभाग-मराठवाड्यातला दुष्काळ हटविणार.पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणार.