श्रीलंकेचा पुर्ण संघ ५० धावात गुंडाळून,भारताने आशिया कपवर कोरले नाव
क्लिक2आष्टी अपडेट-श्रीलंकेवर 10 गड्यांनी मात करत भारताने आशिया कपवर आपले नाव कोरले आहे.कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात श्रीलंकेने दिलेले 51 धावांचे आव्हान भारताने 6.1 षटकात एकही गडी न गमावता पार केले.भारताकडून गिलने 27 तर किशनने 23 धावा केल्या. तत्पूर्वी श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 15.2 षटकांत सर्वबाद 50 धावा करत भारताला विजयासाठी 51 धावांचे आव्हान दिले.
श्रीलंकेचा डाव 50 धावांत गुंडाळला
———————————————————————
श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17, दुसन हेमंथाने नाबाद 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने 6, हार्दिक पंड्याने 3, जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली. सिराजने चौथ्या षटकात 4 विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्याआधी बुमराहने पहिल्याच षटकात श्रीलंकेला पहिला झटका देत कुसल परेराला आऊट केले. तर शेवटी हार्दिकने तीन गडी बाद करत लंकेचा डाव गुंडाळला.
श्रीलंकेने बांगलादेशचा विक्रम मोडला
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी एकदिवसीय सामन्यात बांगलादेशची भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या होती. बांगलादेशचा संघ 2014 मध्ये 58 धावांत ऑलआऊट झाला होता. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर आहे. झिम्बाब्वेचा संघ 2004 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 धावांत ऑलआऊट झाला होता.
श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाने 20 धावाही केल्या नाही
———————————————————————————————————
श्रीलंकेचे फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध झुंजताना दिसले. संघाच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावांची खेळी केली, तर दुसन हेमंथाने 13 धावांची खेळी केली.
पॉवरप्ले;श्रीलंकेचा डाव डगमगला
———————————————————————
पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेचा डाव फसला. संघाने 10 षटकांत 33 धावांत 6 विकेट गमावल्या.सिराजने 5 तर बुमराहने एक विकेट घेतली.संघाचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही,अशी परिस्थिती होती.