व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आमदार आजबे,लेक,पुतण्याच्या लेझिम खेळाने वेधले आष्टीकरांचे लक्ष

शिवशंभो गणेशाचे थाटात विसर्जन

0

क्लिक2आष्टी अपडेट-गणेशोत्सवाचे थाटात विसर्जन शहरात सुरू झाले असून,आमदार बाळासाहेब आजबे यांनीही आज गणेश उत्सवात गणेश विसर्जनाचा आनंद घेत आणलेल्या लेझिम पथकात स्वत;आमदार बाळासाहेब आजबे,पुञ यश बाळासाहेब आजबे,पुतण्या महेश आजबे या तिघांनाही लेझिम पथकात आपली कला सादर करत आष्टीकरांचे लक्ष वेधले आहे.
आष्टी शहरात आमदार बाळासाहेब आजबे मिञमंडळाच्यावतीने शिवशंभो गणेश मंडळाची स्थापना करत आज दि.२५ सोमवारी या गणेशाचे विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू करण्यात आली.हि मिरवणूक पारंपरिक मार्गाने आणत शनि मंदिरासमोर आल्यानंतर स्वत;आमदार बाळासाहेब आजबे यांना लेझिम खेळण्याचा मोह आवरला नाही.या लेझिम पथकात आमदार बाळासाहेब आजबे,पुञ यश आजबे,पुतण्या महेश आजबे या तिघांनीही आपला सहभाग नोंदवत आपला लेझिम डाव खेळल्याने आष्टीकरांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले.
आष्टीकरांना दिली पाच दिवस विविध कार्यक्रमाची मेजवाणी
आमदार बाळासाहेब आजबे मिञमंडळाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या भजनस्पर्धा,गजे ढोल,कवाली मुकाबला व शेवटच्या दिवशी ढोल पथकांचे आकर्षण आणत आष्टीकरांना पाच दिवस विविध कार्यक्रमाची मेजवाणी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.