मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यामध्ये पत्रकार संघाचा निसटता पराभव:पोलीस संघ विजयी
click2ashti update-समाजातील सतत कार्यरत समाजातील सतत कार्यरत असलेले समाजाभिमुख सेवेसाठी अहोरात्र कष्ट करणारे समाजातील दोन घटक म्हणजे पोलीस कर्मचारी आणि पत्रकार हे आहेत.या दोन्ही घटकांचा एकमेकांशी आत्मिक आणि कर्तव्याभिमुख सौहार्दपूर्ण संबंध असतो या दोन घटकांचा सुसंवाद राहावा.यासाठी आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचारी विरुद्ध पत्रकार संघ असा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता.दहा षटकांच्या या सामन्यामध्ये पोलीस संघ विजयी झाला.
पोलीस नाईक गुंडाळे हे पोलीस कर्मचारी संघाचे कर्णधार होते.तर पत्रकार संघाचे कर्णधार म्हणून पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे हे होते.नाणेफेक जिंकून पत्रकार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले पोलीस संघाकडून खेळताना आघाडीचे फलंदाज म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी केवळ ३२ चेंडू मध्ये ५० धावा काढल्या तर पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी केवळ १८ चेंडूत ४८ धावा केल्या.पोलीस संघाकडून खेळताना पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,पोलीस निरीक्षक विजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे,प्रवीण क्षीरसागर,मुदस्सर शेख, अशोक शिंदे या फलंदाजांनी धावसंख्या 144 पर्यंत नेली.
पत्रकार संघाकडून खेळताना दत्ता काकडे यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या तर उत्तम बोडखे,प्रविण पोकळे,भीमराव गुरव,अविशांत कुमकर,गणेश दळवी,अविनाश कदम,जावेद पठाण यांनी त्यांना चांगली साथ दिली.परंतु या अटीतटीच्या सामन्यांमध्ये पोलिस संघाने विजय मिळवला.त्यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी खेळामुळे मन ताजेतवाने राहून काम करण्यास प्रकृती चांगली राहते यासाठी पत्रकार संघाशी सामना आयोजित केला असे सांगितले.तर प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी समाजातील सतत कार्यरत असलेल्या या दोन घटकांचा एकत्रित येण्यासाठी आणि सांघिक असलेला क्रिकेट हा खेळ खेळ असून यातून समन्वय आणि सुसंवाद राखण्यास मदत होईल या उद्देशाने या सामन्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
बातमी स्ञोत-प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,पञकार आष्टी