व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुका दूध उत्पादक संघाचा भारताच्या नंबर वन “अमूल दूध” ला दूध पुरवठा

दोनवेळेस दूध संकलनाने शेतक-यांनाही मिळाला भाव

0

click2ashti update-अमूल ही भारत देशामधील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे.सन १९४६ साली गुजरातच्या आणंद शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली अमूल भारतामध्ये दूध क्रांती घडवून आणण्यासाठी ओळखली जाते.आता “अमूल दूध” संस्थेला आष्टी तालुका दूध उत्पादक संघाचे दूध पुरवठा होत असल्याने आष्टी तालुक्यासाठी कौतुकास्पद बाब आहे.
आष्टी तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.पण या दुष्काळी तालुक्यातील उत्पादनाचे मुख्य साधन कोणते असेल तर तो म्हणजे दूध व्यवसाय होय,आष्टी तालुक्यातील शेतक-यांच्या दूधाला भाव मिळावा म्हणून गेल्या तीस वर्षापासून आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका दूध उत्पादक संघ काम करत आहे.आज या दूध संघाचे दूध भारताचा दूधाच्या बाबतीत नंबर वन ब्रॅण्ड असलेल्या “अमूल दूध” या दूध संस्थेला दूध पुरवठा होत आहे.त्यामुळे आष्टी सारख्या ग्रामिण भागातून एवढ्या मोठ्या संस्थेला दूध पुरवठा होत असल्याने हि तालुक्यात नांदी ठरत आहे.गेल्या महिनाभरापासून आष्टी तालुका दूध उत्पादक संघामार्फत आता सकाळ,संध्याकाळ दूध संकलन करण्यात येत असल्याने शेतक-यांनाही आता आधार होऊन दूध खराब होण्याची चिंता मिटवून भावही जास्तीचा मिळायला लागला आहे.
शेतक-यांना आधार अन् भावही जास्त
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षाही एक रूपाया जास्तीचा भाव दूधाला देत,शेतक-यांना आधार तर मिळतच आहे.परंतु यामुळे आष्टी शहरासह तालुक्यातील बाजार पेठेत उलाढाल होत आहे.त्यामुळे व्यापारपेठही फुलली आहे.आष्टी तालुका दूध उत्पादक संघाच्या गुणवत्ते व पारदर्शी कारभारामुळे शेतक-यांना आधार तर मिळालाच आहे.इतर खाजगी दूध संस्थापेक्षा लिटरमागे तीन रूपये दर जास्तीचा आष्टी तालुका दूध उत्पादक संघामार्फत दूधाला जास्तीचा मिळत असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.