मच्छिंद्रनाथ देवस्थानची विनाकारण बदनामी करणाऱ्या राम खाडे सह इतर दोघांवर कारवाई करा
देवस्थान विश्वस्तांची जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी
click2ashti update-आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट येथे नाथ संप्रदायातील आद्य गुरु श्री मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी मंदिर आहे.या देवस्थान ट्रस्टची राम खाडे (Ram Khade) व इतर दोघे जण विनाकारण तक्रारीवरून होत असलेल्या बदनामी करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देवस्थान च्या विश्वस्तांनी बीड जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हंटले आहे की,आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा येथे श्री मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी मंदिर आहे.येथे प्राचीन समाधी मंदिर आहे. या ठिकाणी नवनाथांपैकी मुख्य नाथ म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ महाराज आहेत.नाथ Nath संप्रदाय हा खूप मोठा सांप्रदाय आहे मुख्य नाथाची समाधी या ठिकाणी असल्यामुळे देशातून राज्यभरातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी सावरगाव या ठिकाणी येत असतात.श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानची न्यास नोंदणी क्रमांक A1276 / बीड आहे. हा न्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 नुसार सहाय्यक धर्मादाय कार्यालय बीड येथे नोंदणीकृत आहे. सदर न्यासाची कार्य महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 प्रमाणे व न्यासाच्या मंजूर योजनेप्रमाणे कामकाज चालू आहे,श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट 1966 मध्ये नोंदणी झालेली आहे. तेव्हापासून सदर न्यास मा.तहसीलदार Thashildar आष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली त्यांच्या अध्यक्षतेखाली 2006-2007 पर्यंत कारभार हाताळला जात होता.तहसीलदार आष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या कमिटी कडून देवस्थानच्या व्यवहारात नुसार चालत नसल्याने सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची चौकशी अंति निदर्शनात आल्याने सदरची कमिटी बरखास्त करून सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत सदर न्यासावर प्रशासक नेमण्यात आला.पुढे प्रशासक यांनी सावरगावचे व शेंडगेवाडीचे ग्रामस्थ व भाविकांमध्ये समन्वय साधून ट्रस्टवर विश्वस्त नेमण्याचे सुचित केले. सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी पाठिंबा दिल्यानंतर तात्कालीन प्रशासक यांनी देवस्थानचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यासाठी इच्छुक व पदसिद्ध आष्टी तालुक्याचे आमदार व सावरगावचे सरपंच यांचे नावे नमूद करून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवला सदर अहवालास 22 मे 2007 रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांनी विश्वास त्यांच्या नावाला मान्यता दिली.त्या नावामध्ये आमदार सुरेश धस व सावरगाव चे सरपंच हे पदसिद्ध सदस्य होते म्हणून त्यांच्या नावाचा विश्वस्त असा उल्लेख होता.त्या अहवालास सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी त्यास मान्यता दिल्यानंतर प्रथम विश्वस्त मंडळ व त्याची रचना करण्यासाठी दिनांक 11 ऑगस्ट 2007 रोजी सर्वसाधारण बैठक झाली सदर बैठकीमध्ये विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून दादासाहेब नरहरी चितळे उपाध्यक्ष बाबासाहेब महादेव म्हस्के,सचिव बाबासाहेब रामभाऊ म्हस्के, सहसचिव चंद्रभान मनोहर लोखंडे व कोपाध्यक्ष प्रल्हाद शिवराम म्हस्के पदसिद्ध तालुक्याचे आमदार सुरेश रामचंद्र धस,सरपंच चांगदेव लक्ष्मण म्हस्के,साहेबराव बाजीराव म्हस्के,रमेश बाबुराव ताटे,अनिल प्रभाकर म्हस्के व एक विश्वस्त पद रिक्त म्हणून कमिटीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर वेळोवेळी कमिटीचा फेरफार अर्जाला सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांनी मान्यता दिली आहे.विश्वस्त मंडळामध्ये आ.सुरेश धस विश्वस्त असल्यामुळे श्री मच्छिंद्रनाथावर त्यांची अपार श्रद्धा व भाविक असल्याने या देवस्थानचा कायापालट झाला असून विकास करण्यामध्ये मोठे सहकार्य केले आहे.कारभारामध्ये सुधारणा झाली असून विश्वस्त मंडळाचा कारभार स्वच्छ आणि चांगला असल्यामुळे विविध शासकीय अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान चांगला अभिप्राय दिले असून देवस्थानात कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही.सर्व कारभार पारदर्शक आहे.आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्यामुळे ४६ एकर जमीन खरेदी,गोशाळा, व्यावसायिक गाळे,अंतर्गत रस्ते,पाणीपुरवठा,अन्नछत्र बांधकाम,भक्त निवास,स्वच्छतागृह,पेव्हिंग ब्लॉक,पार्किंग व्यवस्था,वृक्षरोपण हे बांधकामे पूर्णत्वास केले आहेत तर मंदिर जीर्णोद्धाराचे काम,अन्नछत्र बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम हे कामे प्रगतीपथावर आहेत.असून देवस्थान अनेक
सामाजिक उपक्रम व आरोग्य तपासणी असे शिबिरे नेहमी घेत आहेत.दरवर्षी 500 च्या वरती वृक्ष लागवड व संवर्धन केले जाते.
दररोज 2 ते 3 हजार तसेच अमावस्याच्या दिवशी 50 हजार तर पौष अमावस्या,रंगपंचमी,गुढीपाडवा या यात्रा काळात लाखो भाविकांना अन्नदान केले जाते.कोरोना काळात देवस्थानच्यावतीने 13 कोविड सेंटर मुळे तीन तालुक्यांमधील 20 ते 25 हजार रुग्णांना लाभ मिळाला.श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट चा आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून विकास होत असून ग्रामस्थांचे देखील याला सहकार्य असताना फक्त द्वेषा भावनेने सावरगाव येथील मच्छिद्र चंद्रभान भगत व संदीप रामभाऊ भगत हे दोघे कर्हेवाडी ता.आष्टी येथील राम खाडे यांच्यासह काही लोकांना हाताशी धरून देवस्थान,विश्वस्त मंडळ व आ.सुरेश धस यांची नाहक बदनामी करत असून हे व्यक्ती देवस्थानला बदनाम करण्यासाठी विनाकारण व बिन बुडाचे आरोप करून तक्रारी करत आहेत.या तक्रारदारांचे देवस्थान बाबतीत कोणत्याही प्रकारची योगदान नाही.तक्रारदारापैकी मच्छिंद्र चंद्रभान भगत पूर्वी देवस्थानचे सचिव म्हणून कार्यरत होते ते कार्यरत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात देवस्थानवर भ्रष्टाचार केला होता.देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार व विश्वस्त मंडळ यांनी त्याला सचिव पदावरून काढून टाकले आहे.तेव्हापासून ते देवस्थानाबाबत विनाकारण तक्रारी नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा भ्रष्टाचारी लोकांबरोबर राम खाडे देवस्थानाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.याचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.बीड सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या.सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी होऊन या तक्रारीचा चौकशीचा अहवाल देवस्थानच्या बाजूने देण्यात आलेला असतानाही वेगवेगळ्या मार्गाचा वापर करून तथ्य नसलेल्या आरोप करून मीडिया मार्फत तक्रारी करून देवस्थानची मोठ्या प्रमाणात बदनामी करत असून राम खाडे यांनी आत्तापर्यंत आसपासच्या काही शिक्षण संस्था, पुढारी,अधिकारी लोकांना माहितीच्या अधिकाराचा वापर करून ब्लॅकमेल देख करत आहेत. ते राजकीय देशापोटी आमचे देवस्थानचे विश्वस्त आमदार सुरेश धस यांना बदनाम करत आहेत.आमदार सुरेश धस विकासभिमुख नेतृत्व असून आष्टी,पाटोदा,शिरूर या तीन तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे त्यांना बदनाम करण्याकरता खोट्यानाट्या तक्रारी करून मीडिया मार्फत प्रसिद्धी देऊन देवस्थान व आ.धस यांच्यावर केलेला तक्रारीत कुठेही तथ्य नाही.अशाच प्रकारे तक्रारी चालू राहिल्यास ग्रामस्थांमध्ये भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत असल्याने मच्छिद्र भगत व संदीप भगत हे दोघे व राम खाडे व इतर लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,सहायक धर्मादाय आयुक्त,उपअधीक्षक,लाचलुचपत विभाग यांना अध्यक्ष बाबासाहेब चितळे,
सचिव बाबासाहेब म्हस्के व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी दिले.
आ.सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीपथावर
आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्यामुळे ४६ एकर जमीन खरेदी,गोशाळा, व्यावसायिक गाळे,अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, अन्नछत्र बांधकाम,भक्त निवास, स्वच्छतागृह, पेविंग ब्लॉक,पार्किंग व्यवस्था,वृक्षरोपण हे बांधकामे पूर्णत्वास केले आहेत तर मंदिर जीर्णोद्धाराचे काम,अन्नछत्र बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम हे कामे प्रगतीपथावर आहेत.
कोरोना काळात मदतीला धावणारे जिल्ह्यातले पहिले देवस्थान
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान व आरोग्य विभाग आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांसाठी कोरोना काळात 13 कोविड सेंटर सुरू करून सर्वात अगोदर मदतीला धावणारे पहिले देवस्थान होते.रुग्णाचा खर्च देवस्थान ने केलेला होता.या कोविड सेंटरच्या माध्यमातून जवळपास 20 ते 25 हजार रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाल्याने देवस्थानच्या माध्यमातुन सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता.