स्वतः 2 वर्षे आत बसून बेसन खाऊन आलाय.आता आम्हाला विचारतोय की,सभेसाठी पैसे कुठून आले?’मनोज जरांगे पाटील यांची भूजबळ यांच्यावर सडाडून टिका
click2ashti update-मराठा आरक्षणाच्या आंतरवाली सराटीतील सभेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी एकेरी शब्दांत अत्यंत तिखट टीका केली.’काल त्यांनी पुन्हा फडफड केली. सभेसाठी 7 कोटी कुठून आले? असा सवाल केला.हा स्वतः 2 वर्षे आत बसून बेसन खाऊन आलाय.आता आम्हाला विचारतोय की,सभेसाठी पैसे कुठून आले?’ असे जरांगे म्हणाले.जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाची भव्य सभा सुरू आहे.या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना,भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सरकारला पुढील 10 दिवसांत आरक्षण देण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी त्यांनी या सभेच्या खर्चावर प्रश्न निर्माण करणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला..
..तर येथे येवून विचार मनोज जरांगे पाटील मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून म्हणाले की, आता तर एक नवीच फॉर्म्युला आलाय हो… .ते म्हणतंय…त्याला बोलत नव्हतो बरं का मी… तो एकदिवस म्हणाला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्याचे हे वाक्य ऐकून मी शांत बसलो… पण त्याने काल पुन्हा फडफड केली. सभेसाठी 7 कोटींचा खर्च आल्याचा दावा केला. अरे आम्ही काय तुझ्यासारखी 100 एकर जमीन खरेदी केली का? आम्ही ही शेती विकत घेतली नाही, तर भाड्याने घेतली आहे. येथील शेतकऱ्यांनी स्वतः ती दिली आहे. खरे वाटत नसेल,तर येथे येवून विचार …
दोन वर्षे आत जावून बेसन खाऊन आला
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, गाड्या माझ्या मराठा बांधवांनी स्वतः लावल्यात. त्यानंतरही तो म्हणतो की, लोकं 10 रुपयेही देत नाहीत….. अरे ते तुला देत नसतील…. आणि तुला का देत नाहीत, हे ही सांगतो…. ज्या गोरगरीब ‘तुला मोठे केले, त्यांचेच रक्त पिवून तू मोठा झाला, म्हणून तुझ्यावर धाड पडली. त्याने गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि स्वतः 2 वर्षे आत जावून बेसन खावून आला… आणि आता आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले?
परत आत जाण्याची वेळ आली
माझे मायबाप मराठा काबाडकष्ट करतात… घाम गाळतात…हा त्यांच्या घामाचा पैसा आहे. आम्ही गोदा पट्ट्यातील 123 गावांतून सभेसाठी पैसे गोळा केले. या गावांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा बांधवांची सेवा करण्याचे काम केले. तुझ्यासारखे नाही आमचे… महाराष्ट्रतील संपूर्ण मराठा समाज आम्हाला पैसे देण्यास तयार होता. पण आम्ही 123 गावांनीच सेवा करण्याचा निर्धार केला. 7 कोटींच्या खर्चाचा हिशेब मागणाऱ्यांनी येथे येवून हिशेब घ्यावा.पण आता त्याच्यावर पुन्हा आत जाण्याची वेळ आली,असेही मनोज जरांगे यावेळी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना केली.