व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भारताचा पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय; विश्वचषक स्पर्धेत ८ व्यांदा पाकिस्तानला भारताने चारली धुळ

0

click2ashti update-विश्वचषकात 8व्यांदाही पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवता आला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत आपली अविरत विजयी मालिका सुरू ठेवली.भारतीय संघाने 31 षटकांत 192 धावांचे लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याने 86 धावांची खेळी खेळली.त्याने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली.

पाकिस्तानकडून फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझमने एकमेव अर्धशतक झळकावले. मो. रिझवान 49 धावांवर बाद झाला. 5 भारतीय गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या. भारताकडून रोहितशिवाय श्रेयस अय्यरने 53 धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 2 बळी घेतले.विराट कोहली 9व्या षटकात धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला,पण 10व्या षटकात तो झेलबाद झाला.हारिस रौफने ओव्हरचा तिसरा चेंडू फुल टॉस टाकला,रोहितने तो पंच मारला,पण चेंडू मिड-ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला.रोहित अर्ध्या खेळपट्टीवर धाव घेण्यासाठी आला, पण कोहली क्रीजमध्येच राहिला.रोहितला त्याच्याकडे येताना पाहून कोहलीनेही धावा घेण्यास सुरुवात केली,त्याचवेळी क्षेत्ररक्षक शाहीन आफ्रिदीने स्ट्रायकर एंडला थ्रो फेकला.कोहलीने डायव्ह केला, पण आफ्रिदीचा थ्रो स्टंपला लागला नाही.थ्रो झाला असता तर विराटला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले असते. विराटला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि पुढच्याच षटकात तो झेलबाद झाला.हसन अलीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
पाकिस्तानचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42.5 षटकांत सर्वबाद 191 धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या.त्यानंतर मोहम्मद रिझवानने 49, इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफिकने 20 धावा केल्या.भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,हार्दिक पंड्या,कुलदीप यादव,रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.