व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ट्रकने कट मारल्याने ट्रॅव्हल्स खड्ड्यात;पुणे नांदेडचा ट्रॅव्हल्सचा अपघात

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण जवळील घटना

0

click2ashti update- शुक्रवारी रात्री पुण्याहून नांदेडला प्रवाशी घेऊन निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्स ला बीडवरून अहमदनगर कडे जाणार्‍या एका ट्रक ने कट मारल्याने ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटुन ट्रॅव्हल्स खड्ड्यात गेली. नशीब बलवत्तर म्हणून यातील प्रवाशाचा जीव वाचल्याची घटना बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण) येथे शुक्रवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान घडली.
माऊली ट्रॅव्हल्स एम.एच क्रमांक २२.३८६७ ही पुण्याहून ४० च्या घरात प्रवाशी घेऊन बीडमार्ग नांदेडला जात असताना शुक्रवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान अचानक भरधाव ट्रॅव्हल्स ला बीडहून अहमदनगर कडे जाणार्‍या एका ट्रक ने कट मारल्याने ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रोड लगत असलेल्या खड्ड्यात गेली.सुदैवाने कसलीही जिवीत हानी झाली नसून प्रवाशाना रात्रीच पर्यायी व्यवस्था करत पुढे प्रवासासाठी पाठविण्यात आले.यात कोणीही जखमी झाले नसुन नशीब बलवत्तर म्हणून यातील जवळपास ४० प्रवासाचा जीव वाचल्याची घटना घडली आहे.
ट्रॅव्हल्स अपघातात दिवसेंदिवस वाढ
गेल्या पंधरा दिवसापूर्वीच मुंबई-बीड ही ट्रॅव्हल्स आष्टी तालुक्यातील नगर-बीड राष्ट्रीय महामर्गावरील गांधनवाडी फाटा येथे अपघात झाल्याने पाच जणांना आपला जिव गमवावा लागला होता.बीड येथील सागर ट्रॅव्हल्स होती.अपघातानंतर बीड आरटीओ यांनी पाहणी करून या ट्रॅव्हल्सची लांबी वाढविली असल्याचा अहवाल सादर केला होता.परंतु या ट्रॅव्हल्सची नागालॅण्ड राज्याची पासिंग असल्यामुळे कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचेही सांगीतले होते.त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.