श्री.संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या दिनदर्शिकेचा आष्टीत प्रकाशन सोहळा संपन्न;शहरातील नागरीकांची उपस्थिती
अन्नपुर्ण योजनेचा तालुक्यातील रूग्णांना लाभ
click2ashti update-आष्टी-संपुर्ण राज्यात शाखाविस्तार असलेली व लोकांच्या विश्वासाला वेळोवेळी पाञ ठरलेल्या श्री.संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आष्टी येथील शाखेत संपन्न झाला.या वेळी बँकेचे खातेदार, व्यापारी व प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट चे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी बँकेच्या माध्यमातुन नेहमीच समाजसेवेचे व्रत घेतल्याचे पाहायला मिळते.बँकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात.त्यामुळे या बँकेकडे ग्राहक विश्वासाने पहातात.आष्टी येथील श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या शाखेत रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न झाले.या प्रकाशन सोहळ्याला आष्टी शहराचे माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे,उत्तम गोरे,राजु निकाळजे,संतोष तांबे, समशोद्दिन सय्यद,श्रीकांत कुलकर्णी, परमेश्वर हंबर्डे, बंडू भोगाडे, नवनाथ साळुंके,कार्पोरेट ऑफिसचे अक्षय काळे,सचिन जाजु,नितीन सर आष्टी शाखेचे प्रसन्न देशपांडे,दिपक दळे,गणेश काकडे,कृष्णा पुंड,प्रथमेश शेडेसह बँकेचे खातेदार,व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्नपुर्ण योजनेचा तालुक्यातील रूग्णांना लाभ
संस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्प करत जो श्रीसंत नागेबाबा च्या कुठल्याही शाखेचा खातेदार असेल आणि त्या नातेवाईकांचा खातेदार अहमदनगर शहरातील कुठल्याही हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असेल तर त्या रूग्णाला व एक नातेवाईक असे दोघांना दोन वेळेचे जेवण पुरविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.ख-या आर्थाने या योजनेचा सर्वाधिक लाभ हा आष्टी तालुक्यातील खातेदारांना होत आहे.या अन्नपुर्णा योजनेमुळे नातेवाईक व रूग्णांनामध्ये समाधानाचे वातावरण आहे.