व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह;आत्महत्या की घातपात?

आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील घटना

0

click2ashti update-कौटुंबिक कलह सुरू असल्याने २६ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता झालेल्या (२५) वर्षीय विवाहितेचा मृतदेह बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याच्या घराजवळील स्व मालकीच्या विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.कोमल श्रीकांत राऊत वय वर्ष २५ असे त्या महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड माहेर असलेल्या कोमल हिचा काही वर्षापुर्वी धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.सुरवातीचे काही वर्ष सुखी संसार सुरू होता.पण नंतर सासरकडील मंडळी तिला त्रास देत असल्याने ती २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान सगळे झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून बेपत्ता झाली होती.बेपत्ता झाल्याची तशी नोंद पती श्रीकांत कल्याण राऊत यांनी २७ नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती.२९ नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी स्वताच्या विहीरीत महिलेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे,संतोष क्षीरसागर,लुईस पवार, पोलीस अंमलदार शिवदास केदार,अमोल शिरसाठ,अमोल ढवळे हे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.