स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले;उद्या पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात
निवडणूक निर्णय अधिकारी बी.एम.राऊत यांची माहिती
click2ashti update-संपूर्ण आष्टी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या आर्थिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून,अर्ज भरण्यास दि.८ डिसेंबर पासून होणार आहे.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतर्फे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.संस्थेची मालमत्ता मोठी असल्याने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
मात्र तरीही निवडणूक होणार की बिनविरोध होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिक्षकांच्या संघटना यात सक्रिय झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, एकूण एक हजार मतदार मतदान करणार आहेत.उद्या दि.८ अर्जविक्री सुरू असून,अर्ज दाखल करण्यासाठी १४ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे.१५ डिसेंबरला छाननी,तर १८ डिसेंबर पासून १ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख आहे.त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.तर मतदान दि.१४ जानेवारी २०२४ रोजी आष्टी व कडा या दोन केंद्रावर होऊन,त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी बी.एम.राऊत यांनी नमूद केले.या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार,हे अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल.
या १७ जागेसाठी निवडणूक
या निवडणूकीत सर्वसाधारण प्रतिनिधी १२,अनु जाती,जमाती प्रतिनिधी १,महिला प्रतिनिधी २,इतर मागास्वर्गीय प्रतिनिधी १,भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी १ असे एकूण १७ प्रतिनिधींच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे.
शिक्षकांचा हिरिमोड
या संस्थेची मालमत्ता मोठी असल्याने या निवडणुकीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र असे असले तरी या संस्थेचे बहुतांश मतदार जुने आहेत.अनेकजण निवृत्तीच्या मार्गावर असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे