वेगवेगळ्या कारणातून एका महिन्यांत तीन खून… खूनाच्या घटननेने आष्टी तालुका हादरला !
click2ashti update-जमिनीचा वाद,पैशाची देवाणघेवाणीसह पोलिसांना नाव सांगितल्याच्या कारणावरून एका महिन्यांत धानोरा, दैठणा,वाघळुज या गावात तीन खून झाल्याची घटना घडली असुन पोलिस ठाण्यात तसे गुन्हे दाखल असल्याने या खूनाच्या घटनेवरून तालुका हदारला असल्याचे दिसुन येत आहे.रक्ताची नाते रक्तरंजित लढाई लढत असल्याचे दिसुन येत आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथे ५५ वर्षीय बापाचा केवळ तीन गुंठ्ठे जमिनीत अडसर ठरलेल्या बापाचा पोटच्या मुलाने तर पोलिसांना नाव का सांगितले म्हणून भोसले,काळे गँगने सहकारी दरोडेखोर असलेल्या ३६ वर्षीय तरूणाचा व पैशाच्या देवाणघेवाणीवरून फौजी भावाचा भावाने खून केल्याची घटना घडली.या तीन खूनाच्या घटना महिन्यांत समोर आल्याने तालुका हादरला आहे.रक्त रक्तरंजित लढाई करत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.६ नोव्हेंबर २०२३ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत आष्टी पोलिस ठाणे हद्दीत एक,तर अंभोरा पोलिस ठाणे दोन आशा या घटना घडल्या असून आष्टी,अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तर धानोरा येथील खून प्रकरणी तिघेजण जेलमध्ये असून वाघळुज येथील खून प्रकरणी दोघेजणांना पोलिस कोठडी मिळाली असून दोघेजण फसार आहेत. व दैठणा येथील खून प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत.दैठणा येथील सहा,धानोरा येथील तीन,वाघळुज येथील चार असा तीन घटनेत एकुण १३ आरोपीचा समावेश आहे.