राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास तुफान प्रतिसाद;जिल्हाकृषी अधिक्षक जेजूरकर यांनी दिली भेट
गणेश दळवी आष्टी-गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या डाॅ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास आष्टी,पाटोदा,
शिरूर,जामखेड,कर्जत,भूम,परांडा,पाथर्डी सह इतर तालुक्यातील शेताक-यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास तुफान प्रतिसाद मिळत आहे.
कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आष्टी येथील छञपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालय व माजी आ.भीमराव धोंडे यांनी चार दिवसीय भरविले आहे.हे प्रदर्शन दि.२४ डिसेंबर पासून सुरू झाले असून,आज तिस-या दिवसापर्यंत आष्टीसह पाटोदा,शिरूर,पाथर्डी,जामखेड,कर्जत,भूम,परांडा या तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत या शिबीराचा लाभ घेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान गर्दी होत आहे.दि.२४ डिसेंबर ते २७ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.
शेतक-यांनी लाभ घ्यावा-माजी आ.धोंडे
आष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे.यासाठी शेतक-सह नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.अजून एक दिवस हे शिबीर असणार आहे.त्यामुळे राहिलेल्या नागरीकांनी हे शिबीर पाहूण डोळ्याचे पारणे फेडावे असे अवाहन मुख्य संयोजक माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
सांस्कृतीक कार्यक्रमाचेही मेजवाणी
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास येणा-या नागरीकांना दररोज संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत महाविद्यालीय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून व प्रदर्शन पाहणा-या शेतकरी व नागरीकांना सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
जिल्हा कृषी अधिक्षक जेजूरकर यांची भेट
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शास विविध मान्यवर अधिकारी मोठ्या प्रमाणावर भेट देत असून,आज प्रदर्शाच्या तिस-या दिवसी बीड जिल्हा कृषी अधिक्षक जेजूरकर यांनी भेट देऊन सुमारे चार ते पाच तास थांबून आलेल्या शेतक-यांना अधुनिक शेतीचे महत्व पटवून देत माहिती दिली आहे.