स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची सदिच्छा विरूध्द एकता अशी होणार लढत; 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात
आमदार सुरेश धस विरूध्द आमदार बाळासाहेब आजबे होणार लढत
click2ashti updae-आष्टी तालुक्यातील शिक्षकांची आर्थिक जननी असलेल्या विवेकानंद शिक्षक पतसंस्था निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 79 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात उतरले असून ही लढत दोन पॅनल मध्ये होणार आहे.
आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा शिक्षक पॅनल तर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक एकता पॅनल निवडणूक लढवीत आहे.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी या पतसंस्था निवडणुकीत तीन पॅनल झाल्याने रंगत वाढली होती. परंतु आता समोरासमोर दोनच पॅनल असल्याने राजकीय नेत्यांचाही आता या निवडणुकीत कस लागणार आहे. सुरुवातीला निवडणूक बिनविरोध होणार अशी तालुक्यात चर्चा रंगली होती मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीत शिक्षकांच्या संघटना सक्रिय झाल्याने निवडणुकीच्या प्रचारात वेग आला आहे. स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून एकूण 989 मतदार मतदान करणार आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची मुदत होती. 15 डिसेंबरला छाननी झाली तर 18 डिसेंबर पासून 1 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख होती.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 79 जणांनी अर्ज मागे घेतले असून 34 उमेदवार 17 जागेसाठी रिंगणात उतरले आहेत मतदान दि.14 जानेवारी रोजी आष्टी व कडा या दोन केंद्रावर होऊन, त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
सदिच्छा पॅनलचे अधिकृत उमेदवार
सर्वधारण उमेदवार-मारुती पठाडे,महेशकुमार शिंदे,हिरामण पोकळे,शिंदे विठ्ठल,आप्पासाहेब काळे, करडुळे नितीन,मेहकर प्रवीण,लटपटे अशोक,खाडे चंद्रशेखर,काळे संजय,शेख सलीम,वाणी रावसाहेब
अनुसूचित जाती उमेदवार-बोराडे पोपट
भटक्या विमुक्त जाती उमेदवार-गर्जे आदिनाथ रंगनाथ
इ.मा.व.उमेदवार-गोरे गोरक्ष
महिला राखीव उमेदवार-होळकर मनीषा,शैला सातपुते
——————————————
एकता पॅनलचे अधिकृत उमेदवार
सर्वसाधारण उमेदवार-बाळासाहेब महाडिक,
रत्नाकर चव्हाण,उमेश झांबरे,स्वानंद थोरवे,प्रशांत दगडे,साहेबराव कोहोक,प्रमोद नरुटे,अशोक गाडे,
देविदास भवर,संदीप औटे,कैलास शेकडे,श्रीमती तांबोळी शमिमबानो
अनुसूचित जाती उमेदवार-सुर्वत गव्हाळे
भटक्या विमुक्त उमेदवार-रामभाऊ घुले
इ.मा.व.उमेदवार-बाळू बनसोडे
महिला राखीव उमेदवार-कौशल्या मांगडे,लताबाई ढोबळे