व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“देता का जाता” ट्रॅक्टर रॅलीतून आष्टीतील मराठ्यांचा सरकारला इशारा

सरकारचा विरोध जुगारून आष्टीतील मराठे ट्रॅक्टरसह धडकणार मुंबईत

0

click2ashti update-मराठा आरक्षणाच्या संदर्भात आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने आष्टी शहरांमध्ये महा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये 200 ते 250 ट्रॅक्टर चालक व मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता.यामध्ये हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

मुंबई येथे 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात विराट महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने महाट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा बांधवांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारला मराठा आरक्षण” देता की जाता” इशारा दिला 20 जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास आष्टी तालुक्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या बरोबर मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे आगे कूच करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने याची दखल घेत मराठा आरक्षणासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा आष्टी तालुक्यातून हजारो मराठा युवक व शेतकरी मुंबई येथील महामोर्चासाठी उपस्थित राहणार असल्याचे सकल मराठा बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.आष्टी येथील विराट ट्रॅक्टर रॅली नगर रोडवरील मोरेश्वर मंगल कार्यालय लिमटाका चौक या ठिकाणी सुरू होऊन बेलगाव रोड,आहिल्यादेवी होळकर चौक ते व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक,छत्रपती संभाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनी मंदिर,आष्टी कमान वेस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते कमानवेस महात्मा ज्योतिबा फुले चौक,महावीर चौक,छत्रपती व्यापारी संकुल आष्टी या ठिकाणी सर्व ट्रॅक्टर रॅली थांबवून या ठिकाणी समारोप करण्यात आला.

20 जानेवारी रोजी मुंबईकडे जाण्याचे नियोजन सर्व उपस्थित सकल मराठा समाजाच्या विचाराने करण्यात आले.
सरकारचा विरोध जुगारून आष्टीतील मराठे ट्रॅक्टरसह धडकणार मुंबईत
सरकारने मुंबईत ट्रॅक्टरला बंदी घातली असली तरी सरकारचा विरोध जुगारून आष्टीतील मराठ्यांनी आष्टीत ट्रॅक्टर रॅली काढत
20 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या मुंबई येथील विराट मोर्चा साठी सरकारकडून ट्रॅक्टर बंदी घालण्यात आली असली तरी आष्टी तालुक्यातून हजारो शेतकरी व मराठा युवक हजारो ट्रॅक्टर सह मुंबई येथे दाखल होणार असल्याचे सकल मराठा बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.