ऊसतोड कामगारांगा पहाटे जेवण द्या यासाठी आपण मुख्यमंञी यांना भेटणार-आ.सुरेश धस
ऊसतोड मुकादमांनी केला आमदार धस यांचा सत्कार
click2ashti update-पहाटेच ऊठून ऊसतोडणीसाठी फडात जाणा-या मजूरांना अनेक वेळा उपाशी राहण्याची वेळ येते,आशावेळी त्याच्यासोबत असणा-या लहान मुलांची तरांबळ होते.यावर उपाययोजना राबविण्यासाठी राज्य सरकारने बांधकाम मजूरांन प्रमाणे देण्यात येत असलेल्या मध्याह भोजनासारखी योजना ऊसतोड मजूरांना पहाटेचे जेवण द्या यासाठी आपण राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथील औव्दैतचंद्र या निवासस्थानी ऊसतोड मुकादमांनी यावर्षी ऊसतोड मजूर व मुकादमांची ३५% वाढ केल्याबद्दल मंगळवार दि.१६ रोजी दुपारी १२ वा.आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात उत्तर देतांना ते बोलत होते.यावेळी स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप,सचिव सुरेश वनवे,भाऊसाहेब आंधळे,दत्तोबा भांगे,विष्णुपंत जायभाये,संजय तिडके,प्रविण बांगर,तात्यासाहेब हुले यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.सुरेश धस म्हणाले,यावर्षी भाववाढीसाठी लावादासमोर आम्ही आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोबत साखर संघाच्या बैठकीसाठी हजर होतोत.व तिथे पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मुकादम व मजूरांना ५५ % भाववाढीची मागणी केली होती.परंतु साखर संघ आपली वाढ ही ७% व २% करत होते.यावर शेवटी तोडगा काढून आम्ही आमची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे करत ३४+१=३५% वाढ करण्याची केली.आणि तीच मागणी साखर संघाने मान्य केली. पंकजा मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा खंबीरपणे चालविला असल्याचेही आ.धस सांगितले.तसेच ऊसतोड मुजूरांच्या आजही मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने ऊसतोड मजूरांच्या लहान मुलांचा विमा,तसेच ऊसतोड महिला जर कामावर असतांना तिची प्रस्तूती झाली तर तिचा संपूर्ण खर्च शासनाने करावा व यासह विविध प्रश्न आपण शासन दरबारी मांडून याचा निपटारा करणार असल्याचेही आ.धस यांनी सांगितले.यावेळी तुकाराम तिडके,बाळासाहेब जोगदंड,महादेव शेंडगे,महादेव दराडे,देविदास तोंडे,चंद्रभान मुंडे,महादेव जनजन,अर्जुन तिडके,पोपट सानप,पिंटु डोंगरे,हनुमंत काळे,विकास सानप यांच्यासह मोठ्यासंख्येने मुकादम उपस्थित होते.