व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कारसेवकांनी केलेल्या कार्याचा ख-या आर्थाने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सन्मान-आ.सुरेश धस

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आष्टीकरांचा उत्साह शिगेला

0

click2ashti update-आपल्या जिवावर उदार होऊन,लेकरं बाळांचा विचार न करता बिनधास्तपणे आयोध्यात जाऊन बाबरी मज्जीदचा ढाच्या नेस्तानाबूत करणा-या कार सेवकांचा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मानस पुर्ण झाला असून,आज संपूर्ण देशात दिवाळी साजरी होत असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.


आष्टी येथील श्रीराम मंदिरात सोमवार दि.२२ रोजी आयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सन १९८९ व १९९२ साली जे कारसेवक आयोध्या येथे जाऊन राम मंदिरासाठी आपले योगदान दिले त्यानिमित्त त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात आ.धस बोलत होते.यावेळीश्रीधर पंत,अॅड.बाबुराव अनारसे,लालासाहेब कुमकर,संजय मेहेर, अॅड.वाल्मिक निकाळजे,प्रफुल्ल सहस्ञबुद्दे, भाऊसाहेब लटपटे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,रामाने १४ वर्ष वनवास भोगला तर रामाच्या प्राणप्रतिष्ठाले ५०० वर्ष वनवास भोगावा लागला आहे.आणि त्यांचा हा वनवास देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्रभाई मोदी यांनी आज संपविला आहे.ज्या कारसेवकांनी राम मंदिरासाठी जे काहि अनुभव आले त्यांचे अनुभव त्यांनी सांगून आपण त्यांच्या अनुभवाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार असल्याचे आ.धस यांनी सांगीतले.नविन पढीला आमचे सांगणे आहे की हा सन्मान खुप छोटा नाही.सन १९८९ व १९९२ साली या कारसेवकांनी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.६ डिसेंबर १९९२ ला या बहाद्दराने श्रीरामाच्या जागेवर असलेली बाबरी मज्जीदचा ढाच्या नेस्तानाबूद केला असल्याचेही त्यांनी सांगीतले.यावेळी आष्टी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,नगरसेवक रंगनाथ धोंडे,नगरसेवक भारत मुरकूटे,सुरेश वारंगुळे,अक्षय धोंडे,शाम वाल्हेकर यांच्यासह शहरातील व्यापारी,नागरीक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन अॅड.सग्राम गळगटे यांनी करून आभार मानले.


या कार सेवकांचा केला सन्मान
पांडूरंग जगताप,सखाराम बळे(पारगांव जो),श्रीधर पंत सहस्ञबुद्दे,अॅड.बाबुराव अनारसे,विनायक खांडके,बाबा शेटे,लालासाहेब कुमकर,बाळासाहेब जगताप,अॅड.श्रीकृष्ण देशपांडे,दत्ताञय धस,विश्वभंर जगताप,दत्ताञय जगताप,तात्याभाऊ जगताप,राजाभाऊ ढोबळे, लालासाहेब जगताप,संपत आवारे,काकासाहेब शिंदे, शिवाजी घोलप,बबन आणेराव,भाऊसाहेब कोकणे, कैलास चंदनशिव,राजाभाऊ बोडखे,प्रभाकर कुलकर्णी,सतिष उर्फ बंडू धोंडे,अतुल गरगडे,सुभाष जगताप,दिलीप कदम,पदूमामा वैष्णव,आंबादास धोंडे,बंडू देशमुख,बबन शिंदे,शामभाऊ भोसले,किशोर झरेकर,विकास धुमाळ,पोतदार देवा,सुहास वर्धमाने,अशिष देशपांडे,संतोष शेटे,दुर्गेश कुलकर्णी,नीरज देशपांडे,अनिरूध्द चव्हाण, प्रा.सुनिल पंढरे,सोमनाथ देशमुख,विनय पढधरिया, पांडूरंग बळे,प्रशांत सहस्ञबुद्दे,प्रशांत काटेकर या सेवकांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आमदार धसांनी पाटोद्यात धरला श्रीरामाच्या गाण्यावर ठेका पहा व्हिडीओ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.