व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“नमो चषक”अंतर्गत आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा मुर्शदपुर गणाच्या वतीने संपन्न

0

click2ashti update-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने तरुणांमध्ये खेळाडू वर्ती जोपासण्यासाठी देशभरात “नमो चषक”२०२४ अंर्तगत मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिषदेचे कार्यसम्राट आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ.सुरेश धस मित्र मंडळ मुर्शदपुर गणाच्यावतीने भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शनिवार दि. शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टी येथे नगरपंचायत नगराध्यक्ष जियाभाई बेग यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत संपन्न झाली.
आष्टी येथील छत्रपती शिवाजी चौक ते गणपती चौक अशी ४ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये ५३ स्पर्धकांनी भाग घेतला होता.यामध्ये भव्य मॅरेथॉनमध्ये प्रथम बक्षीस पं.स. सदस्य तथा सरपंच अशोक मुळे यांचे ६६६६, द्वितीय बक्षीस सरपंच अशोक पवार यांचे ५५५५,तृतीय बक्षीस प्रविण वारे ४४४४,चतुर्थ बक्षीस शहादेव धनवडे ३३३३,पाचवे,युवा नेते गणेश पोकळे २२२२/- यांनी बक्षित आयोजित केले होते.यामध्ये प्रथम दिगंबर डमाळे,द्वितीय ओमकार आव्हाड,तृतीय योगेश निमसे,चौथे तेजस कांबळे,पाचवे रामदास गर्जे या स्पर्धक विजेते झाले होते.यावेळी सरपंच अशोक मुळे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, नगरसेवक सुनील रेडेकर,शिवसेना नेते जालिंदर वांढरे,डॉ.जालिंदर वांढरे,माजी जि.प.सदस्य खंडू जाधव,अशोक पवार,माजी सरपंच अतुल कोठुळे,गणेश पोकळे,गटनेते किशोर मामा झरेकर,नगरसेवक सुरेश वारंगुळे,ग्रा. प.सदस्य कपिल अग्रवाल, बबलू शेठ शेख, मनोज धनवडे,जगनाथ खिलारे,आशिष अग्रवाल,गणेश पोकळे,भाऊ माने,बंडू गिते,बंटी धोंडे,आशिष अग्रवाल,सचिन मुळे,राजू लोखंडे,विवेक चव्हाण,ज्योतिबा रेडेकर,सतीश जंगले,शहादेव धनवडे,
बाबुराव गुरव,शहादेव नरवडे,अशोक राऊत,रमेश बोराडे,सरपंच शहाजी साप्ते,रावसाहेब मुटकुळे,बाळासाहेब घोडके,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,पत्रकार शरद रेडेकर,गणेश दळवी आदी उपस्थित होते.तर या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून शिक्षक संजय भोकरे आणि अदनाक सर यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.