व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

BREAKING NEWS-शरद पवार गटाला मिळाले “तुतारीवाला माणूस” हे नवं चिन्ह;केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

पर्याय दिलेले तिन्ही चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारले

0

click2ashti update-शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला आता ‘तुतारीवाला माणूस’ हे नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात गुरुवारी रात्री आदेश जारी केले. आदेशात म्हटले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला ‘तुतारी’ (Man Blowing Truha) हे चिन्ह वापरण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने’राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’असे नाव दिले होते. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे.वटवृक्षासह अन्य दोन चिन्हांचा पर्याय शरद पवार गटाने मागितल्याची माहिती होती.पण आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले.
राष्ट्रवादी पक्ष,चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात
या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं.त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.
कोर्टाने दिले होते आदेश,मिळाले चिन्ह
सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते.तसंच,अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते.परंतु,त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही.तर, निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.
काय म्हटले पक्षाच्या अधिकृत पेजवर…!

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.