click2ashti update-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता.यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते.शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार,मुंबईचे महापौर,विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.
मनोहर जोशींची यांची कारकीर्द
प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशीबी होता.वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले.
जोशी यांची राजकीय कारकीर्द
प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक,महापौर,विधान परिषदेचे सदस्य,आमदार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,खासदार,केंद्रीय अवजड उद्योगमंत्री,लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे.
यामुळे दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
1998 मध्ये युती सरकारच्या काळात मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा पुण्यात कर्वे रोडसारख्या प्राईम एरिआत त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.