चोभानिमगाव मध्ये भाजपच्या गाव चलो अभियान:गावक-यांनी लावला उधाळून
कार्यक्रमात मराठा आंदोलनकर्ते आक्रमक: व्यासपीठावरील भाजपचे बॅनर काढण्यास भाग पाडले
click2ashti update-आष्टी तालुक्यातील कानिफनाथ विद्यालयात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवारी गाव चलो अभियान कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपचे मोदी फडणवीस यांचे बॅनर लागल्याने आंदोलनकर्ते संतप्त होऊन भाजपच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आयोजकांना बॅनर उतरवण्यास भाग पाडले.
सध्या मराठा समाज भाजपच्या विरुद्ध आक्रमक झाला असून आमच्या गावात कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम ठेवू नका असा पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.आष्टी तालुक्यातील चोभानीमगाव येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कानिफनाथ विद्यालयांमध्ये गाव चलो अभियानाचा कार्यक्रम ठेवला होता.या कार्यक्रमात अचानक पन्नास ते साठ मराठा समाजाचे लोक येऊन एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत शाळेतील कार्यक्रमात पक्षाचे बॅनर का असा सवाल करत ते बॅनर उतरवण्यास भाग पाडले.आयोजकांनीही तात्काळ ते बॅनर उतरवून घेतल्यानंतर संतप्त झालेला समाज शांत झाला.
गावामध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाही
अंतरवली मध्ये शांतपणे उपोषण करणाऱ्या महिला व पुरुषावर अमानुषपणे पोलिसांनी हल्ला केला त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का लावली नाही?मात्र जरांगे पाटील यांनी एक शब्द वापरला तर त्यांची एसआयटी चौकशी लावण्यात आली हा एक प्रकारे अन्याय असून तो अन्याय आम्ही सहन करणार नाही.गावामध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाही
-कांतीलाल गिर्हे,सकल मराठा समाज आंदोलनकर्ता