व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अखेर..शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव थेट जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश निघाला;आ.सुरेश धस यांच्या अथक परिश्रमाचे फलित

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

0

click2ashti update-उजनी प्रकल्पातील पाणी शिंपोरा येथून थेट जलवाहिनीद्वारे खुंटेफळ साठवण तलावात सोडण्याच्या कामाचे आज कार्यारंभ आदेश पारित झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होऊन आष्टी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे या कामासाठी आपण गेली अनेक वर्ष प्रयत्नशील होतो त्या प्रयत्नांचे फलित आज प्राप्त झाले आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आमदार सुरेश धस यांनी यांनी आभार मानले आहेत.


याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले,आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरणारा खुंटेफळ साठवण तलाव अर्थात आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ ही बहुप्रतिक्षित बहुचर्चित असून त्यातील थेट जलवाहिनी कामाचे कार्यारंभ आदेश निघाल्यामुळे आपल्या कित्येक वर्षाच्या तपश्चर्येला फळ आले असून सुमारे 1108 कोटी रु. किमतीच्या योजनेमुळे आष्टी तालुक्यातील सतत दुष्काळाचे छायेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव हे अंतर 72.33 किलोमीटर असून येथून खुंटेफळ साठवण तलावापर्यंत बंदिस्त जलवाहिनी 2360 मिलिमीटर व्यासाची असून या योजनेसाठी शिंपोरा, कर्जत आणि राशीन या तीन ठिकाणी पंप हाऊस निर्माण करण्यात येणार आहेत.मराठवाड्याच्या हक्काचे 5.68 टीएमसी पाण्यापैकी सध्या 1.68 टीएमसी पाणी मिळणार असल्यामुळे या जलवाहिनीद्वारे येणाऱ्या पाण्या मुळे आष्टी तालुक्यातील 8147 हेक्टर एवढ्या क्षेत्राला पाणी उपलब्ध होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षित असलेल्या या थेट पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे विकासाभिमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार सुरेश धस यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.
लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.या जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती मिळताच आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.