व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खुंटेफळ साठवण तलाव पूर्णत्वाबाबत आ.सुरेश धस यांनी शब्द खरा करून दाखवला विविध विकास कामांना मंजुरी

लाभक्षेत्रातील शेतकरी,नागरीक,कार्यकर्त्यांकडून तलावाच्या सर्वेपासून कार्यारंभ आदेशा पर्यत श्रेय धसांनाच अभूतपूर्व उत्साहात कृतज्ञता व्यक्त

0

click2ashti update-शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या ७२ कि.मी.अंतराच्या थेट जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश झाल्याने आनंदीत झालेल्या शेतकरी,नागरीक आणि कार्यकर्त्यांकडून आज त्यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी,ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला.त्याचबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांनीही यावेळी गर्दी केली होती.


सतत दुष्काळग्रस्त असलेल्या आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणारी आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ अर्थात खुंटेफळ साठवण तलाव येथे उजनी जलाशयाचे पाणी शिंपोरा येथून थेट खुंटेफळ साठवण तलावामध्ये जलवाहिनीद्वारे आणण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री,तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाणी आणण्याच्या या योजनेचे कार्यारंभ आदेश दिल्यामुळे या तलावाचे पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे.येत्या काही दिवसात शेतीसिंचनासाठी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंददायी दिवस येणार आहेत.या आशेवर गेली कित्येक दिवस प्रतीक्षेत असलेला या लाभक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला त्या परिसरातील पुंडी,खुंटेफळ,कुंभेफळ,सोलापूरवाडी,बाळेवाडी,वाहिरा,पिंपळगावदाणी,कानडी खुर्द,निमगाव बोडखा,घोंगडेवाडी,पारोडी,बोरोडी, पिंपळा,यासह इतर गावातील शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस यांनी या संदर्भातील वेळोवेळी पाठपुरावा करून खुंटेफळ साठवण तलावाच्या पूर्णत्वासाठी दिलेला शब्द खरा करून दाखवल्या मुळे अत्यंत आनंदित होऊन त्यांचे अत्यंत हृदयपूर्वक आभार मानले.त्याच बरोबर आष्टी,पाटोदा,शिरूर कासार या तिन्ही नगरपंचायत तसेच आष्टी मतदारसंघातील देवस्थान व इतर विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा भरघोस निधी आ.सुरेश धस यांनी घेचून आणला आहे.


तलावाच्या सर्वेपासून कार्यारंभ आदेशा पर्यत श्रेय धसांनाच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
खुंटेफळ,पुंडी,सोलपुरवाड़ी,कुंभेफळ गावातील शेतकऱ्यांनी सर्वेपासून जमीन खरेदी पर्यन्त कोणाचा विरोध होता आणि कोणी या कामासाठी दगड खाले तसेच या योजनेचे खरे नायक आ.सुरेश धस असून २००१ पासून या कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा कसा केला आहे त्यांचे अनुभव सांगत लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी तलावाच्या सर्वेपासून कार्यारंभ आदेशापर्यत श्रेय आ.धस यांनाच असल्याचे यावेळी बोलताना सांगितला.
खुंटेफळ साठवण तलाव कामाची कार्यपुस्तिका प्रकाशित करू
श्रेय कोणाचे ?हे जनता ठरवेल-आ.सुरेश धस

सतत अवर्षणग्रस्त असणाऱ्या आष्टी तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे या बळीराजाच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत यासाठी शाश्वत सिंचनाची सोय करावी या विशाल हेतूने आपण खुंटेफळ साठवून तलाव या प्रकल्प चा संकल्प करून हा तलाव लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी प्रयत्न करत आहोत.या तलावाच्या सर्वेक्षणापासून ते जलवाहिनी कामाच्या कार्यारंभ आदेशापर्यंत शासन दरबारी आपण केलेल्या पाठपुरावा बाबतचे लेखी दस्तऐवज कार्यपुस्तिका रूपाने प्रसिद्ध करणार आहोत. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे श्रेय कोणाला आहे याचा निर्णय आष्टी तालुक्यातील जनता जनार्दन घेईल असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.